शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आप्तस्वकीय कोणाला तापदायक? सावंतवाडीत दीपक केसरकरांशी उद्धवसेनेची कडवी झुंज

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 4, 2024 10:39 IST

Maharashtra Assembly Election 2024: याआधी सलग दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखलेल्या राजन तेली यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा लढत होत आहे.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग - याआधी सलग दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखलेल्या राजन तेली यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा लढत होत आहे. मात्र, यावेळी तेली हे उद्धवसेनेकडून रिंगणात असून महायुतीमध्ये भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने केसरकर यांना आघाडीप्रमाणेच आप्तस्वकीयांचाही सामना करावा लागणार आहे. 

मागील सलग तीन निवडणुकांमध्ये विजयी मिळविलेल्या केसरकर यांना सावंतवाडीचा बालेकिल्ला टिकविण्याचे उद्धवसेनेकडून कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही बिघाडी असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

२००९ नंतर प्रथमच राणेंचा पाठिंबा- २००९ मध्ये दीपक केसरकर पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झाले. यावेळी त्यांच्यासमवेत तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेल्या राणेंचा पाठिंबा होता.-  मात्र, २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुका केसरकर यांनी शिवसेनेकडून लढविल्या आणि त्यांच्याविरोधात राजन तेली हेच उमेदवार होते. तेली २०१४ ला भाजपाकडून तर २०१९ ला अपक्ष म्हणून लढले. मात्र, या दोन्ही निवडणुकीत केसरकरांनी बाजी मारली होती.- आता केसरकर चाैथ्यांदा रिंगणात असून यावेळी त्यांना भाजपची म्हणजे राणेंची साथ मिळणार आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?- लोकसभा निवडणुकीत भाजपचे नारायण राणे विजयी झाले. सावंतवाडी मतदारसंघात त्यांना २९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यात केसरकरांचा मोठा वाटा होता.

निवडणुकीतील कळीचे मुद्देगेल्या पाच वर्षात केसरकर यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली मात्र, त्यातील एकही मोठा प्रकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत. केसरकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून भाजपच्या विशाल परब यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपाची साथ मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Rajan Teliराजन तेली