शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 12:10 IST

बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बऱ्याच मतदारसंघात महत्वाच्या पक्षातील इच्छुकांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले आहे. तर त्यातील अनेकांचे उमेदवारी अर्ज शनिवारी झालेल्या छाननीत वैध सुद्धा ठरले आहे. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली असून, बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पक्ष उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. तर आज रविवार असल्याने उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा उद्याचा ( सोमवार ) शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 'बंडोबाणांचा' संडे असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

अर्ज छाननी होताना अनेक बंडखोरांचे अर्ज रद्द होतील, अशी अपेक्षा सर्वच पक्षातील अधिकृत उमेदवारांना होती. मात्र बऱ्याच ठिकाणी बंडखोरांचे अर्ज वैध ठरली आहे. त्यामुळे पक्ष उमेदवारांची चिंता वाढली आहे. तर सर्वच पक्षातील पक्षश्रेष्ठींनी बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.तसेच पक्ष उमेदवार यांनी बंडखोरांच्या भेटीगाठी घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आलेल्या संधीचं सोण करू पाहणाऱ्या बंडखोरांनी उमेदवारांकडे आश्वासनांची यादीच   सादर केली असल्याचे सुद्धा काही ठिकाणी पहायला मिळत आहे.

आज रविवार असल्याने सोमवारीच अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस बंडखोरांना सांभाळताना पक्ष उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय परिस्थितीविषयी उत्कंठा वाढली असून बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजप-शिवसेनेत सुद्धा मोठ्याप्रमाणावर बंडखोरी झाली असल्याचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसात बंडखोरांनी माघार घ्यावे अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा पक्षाच्या नेत्यांंकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. तर अनेक बंडखोरांनी आता माघार नाहीच, अशी भूमिका घेतली असल्याने पक्ष उमेदवार यांच्या अडचणी वाढल्या आहे.