शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:10 IST

मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला आलेल्या सत्तार यांना फडणवीस यांनी थेट आपल्या बसवर प्रवेश दिला.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बुधवारी सिल्लोडमध्ये आली असताना आमदार अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपचे स्थानिक नेते असा वाद पाहायला मिळाला. सत्तार यावेळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा असताना, सत्तार यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी यावेळी केला. मात्र माघार घेतील ते सत्तार कसले ? आंबेडकर चौकात उभारलेल्या मंचासमोर यात्रा येताच सत्तार यांनी थेट महाजनादेश यात्रेच्या बसवर प्रवेश मिळवला. त्यामुळे सिल्लोडमध्ये आलेल्या महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा पाहायला मिळाली.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिल्लोडमध्ये येणार म्हणून फडणवीस यांच्या स्वागताच्या तयारीसाठी स्थानिक भाजप नेते आणि आमदार सत्तार यांच्यात तीन दिवसांपासून स्पर्धा लागली होती. बुधवारी सकाळपासूनच दोन्ही गटात नीलम चौकात व्यासपीठ उभारणीवरून वाद सुरु होता. सत्तार यांनी उभारलेल्या स्टेजला भाजप नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे शेवटी पोलिसांनी व्यासपीठ उभारणीला परवानगी नाकारली आणि स्टेज ताब्यात घेतला.

सत्तार यांची कोंडी करण्यात अपना यशस्वी झाल्याचा आनंद भाजपच्या नेत्यांना होत नाही तोच, सत्तार यांनी आंबेडकर चौकात आपला व्यासपीठ उभारणीचा निर्णय घेतला. यात्रा सिल्लोडमध्ये आल्यावर आधी नीलम चौकात भाजपच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. मात्र त्यांनतर ही यात्रा पुढे आंबेडकर चौकात येताच सत्तार यांनी उभारलेल्या व्यासपीठा जवळ थांबवण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला आलेल्या सत्तार यांना फडणवीस यांनी थेट आपल्या बसवर प्रवेश दिला.

विशेष म्हणजे सत्तार हे बसवर चढत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हात पुढे करता त्यांना आधार दिला. सत्तार हे बसवर चढताच त्यांच्या  समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बस शहरात जाईपर्यंत सत्तार बसवरच उभे होते. भाजपच्या समर्थकांनी रोखण्याच्या केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आमदार सत्तार हे आपल्या खेळीत यशस्वी झाले. त्यामुळे महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.