शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महाजनकोने कोराडीचे संच मातीमोल किमतीत विकले

By admin | Updated: June 11, 2017 00:23 IST

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीने (महाजनको) कोराडीतील निकामी झालेले ४६५ मे.वॅ. क्षमतेचे चार संच केवळ ६०.६० कोटी रुपयांत नागपूरच्याच सनविजय

- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीने (महाजनको) कोराडीतील निकामी झालेले ४६५ मे.वॅ. क्षमतेचे चार संच केवळ ६०.६० कोटी रुपयांत नागपूरच्याच सनविजय रिरोलिंग इंजिनिअरिंग वर्क्सला विकल्यामुळे ऊर्जा क्षेत्रात खळबळ आहे. या संचाची आजची किंमत २५० कोटी रुपये मिळायला हवी होती, असे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.प्रकरण काय आहेमहाजनकोने २००७ साली ऊर्जा प्रकल्प नूतनीकरण कार्यक्रमात कोराडीचे संच क्र. १ ते ४ (१२० मे.वॅ. चे ३ व १०५ मे.वॅ.चा एक) निवडले. हे संच ३५ ते ४० वर्षे जुने होते. ते २०१० साली बंद करण्यात आले व त्यांच्याऐवजी ६६० मे.वॅ.चे तीन संच उभारण्यात आले. जुने/निकामी झालेले हे संच विकण्यासाठी महाजनकोने मिनरल्स अ‍ॅण्ड स्टील ट्रेडिंग कॉर्पोरेशनमार्फत (एमएसटीसी) आॅनलाईन लिलाव ५ नोव्हेंबर २०१६ ला सुरू केला.लिलावाची जाचक अटलोकमतजवळ असलेल्या कागदपत्रांनुसार या लिलावात भाग घेणाऱ्या कंपनीजवळ १०० कोटींची मालमत्ता व गेल्या तीन वर्षांत सरासरी १०० कोटींची उलाढाल, अशी एक जाचक अट टाकली होती.लिलावाच्या पहिल्या फेरीत सनविजय रिरोलिंग, नागपूर व सिक्कीम फेरो अलॉईज, मुंबई अशा दोनच कंपन्यांची बोली आली. त्यात मालमत्ता व उलाढाल १०० कोटींपेक्षा कमी असल्याने सिक्कीम फेरो अलॉईज बाद झाली. दुसऱ्या फेरीत पुन्हा सनविजय रिरोलिंग व अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटर्स, मुंबई अशा दोनच निविदा आल्या. नियम डावललेसर्वसाधारणपणे अशा लिलावासाठी तीन कंपन्यांची बोली आवश्यक असताना एकच कंपनी रिंगणात उरली होती. तिचीच बोली स्वीकारण्यात आली. दुसरे म्हणजे, एमएसटीसीच्या वेबसाईटवर अशा लिलावासाठी चार ते सहा फेऱ्या होताना दिसतात. पण महाजनकोने दुसऱ्याच फेरीत लिलाव पूर्ण केला हे संशयास्पद आहे.मातीमोल किंमतयाबाबत लोकमतने कोराडीच्याच एका निवृत्त मुख्य अभियंत्याशी संपर्क साधला. या अधिकाऱ्यानुसार या चारही संचांची अंदाजे किंमत २५० कोटी असावी. कारण त्यातून निघणाऱ्या तांब्याच्या तारांचीच किंमत ६० ते ७० कोटी असेल. इतर धातू अ‍ॅल्युमिनीयम, लोखंड, जस्त व इतर सामुग्रीचे अंदाजे २०० कोटी येतील. आज ४६५ मे.वॅ. वीज क्षमता नव्याने निर्माण करायला ३००० कोटींपेक्षा अधिक खर्च येईल. त्यानुसार या जुन्या संचाची २५० कोटी किंमत योग्य आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.लोकमतने याबाबतीत एमएसटीसीच्या इतर आॅनलाईन लिलावांचीही माहिती घेतली. पश्चिम बंगालमधील संथालडीह ऊर्जा प्रकल्पाचे १२० मे.वॅ.चे चार संच २०१२ साली ११४ कोटीत विकले गेले होते. त्याचबरोबर सध्या उत्तर प्रदेशातील ओबरा प्रकल्पाच्या ५० मे.वॅ.च्या तीन संचाचा आॅनलाइन लिलाव सुरू आहे. २० जून शेवटची तारीख आहे. त्याची सरकारी किंमतच ६५ कोटी आहे.

(उद्या वाचा - महाजनकोचे अधिकारी काय म्हणतात.)