शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाबिजच्या भेसळयुक्त बियाण्यांची कृषी विभागाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 18:21 IST

नाना देवळे  वाशिम, दि. 1 - महाबिजकडून विक्री करण्यात येत असलेले बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी असतांनाच महाबिजचे बियाणे भेसळयुक्त ...

नाना देवळे वाशिम, दि. 1 - महाबिजकडून विक्री करण्यात येत असलेले बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी असतांनाच महाबिजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी लोकमतने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक उगवले दुसरेच’ या मथळ्या खाली वृत्त प्रकाशीत करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने घेत १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांने मागितलेले बियाणे तर इतर बियाणे ७० टक्के असल्याचे त्यांना आढळून आले. मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील  गोविंदा मोतीराम भगत या शेतकºयाने यंदाच्या हंगामात पेरणीसाठी खरेदी विक्री समितीमधून  ८ जुन २०१७ रोजी अनुदानाचे तीन बॅग सोयाबीन बियाणे विकत घेतले. त्यांनी महाबिजच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली.काही दिवसांनी बियाणे चांगले उगवले.परंतु सुरुवातीला रोपे लहान असतांना त्यांना त्यामध्ये मिश्र वाण असल्याचे दिसले नाही. पंरतु रोपे मोठी झाल्यानंतर काही रोपांची पाने लांबट असल्याचे दिसून आले तर काही पाने गोलसर असल्याचे दिसून आले.त्यावरुन  बारकईने निरीक्षण केले असता त्यांनी घेतलेल्या ९३०५ या सोयाबीन बियाण्यासह दुसऱ्या वाणाचेही रोपे असल्याचे आढळून आले. महाबिजचे ९३०५ हे सोयाबीन बियाणे इतर सोयाबीन वाणापेक्षा अगोदर येणारे आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांची समस्या उजागर करण्यासाठी लोकमतने २५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान तसेच शेतकऱ्याने याबाबत केलेल्या  तक्रारीचा उल्लेखही करण्यात आला होता. सदर तक्रारीची दखल कृषी विभागाने घेतली आणि मंगळवार १ ऑगस्ट रोजी शेतकरी गोविंदा मोतीराम भगत यांच्या चांभई येथील शेतास भेट देऊन उगविलेल्या सोयाबीन  बियाण्याची पाहणी केली. यावेळी कृषी शास्त्रज्ञ भरत गिते, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, महाबिज सहाय्यक क्षेत्र अधिकारी एस.बी.नवगण, कृषी सहाय्यक निरंजन महल्ले उपस्थित होते. या चमूने केलेल्या पाहणीत सोयाबीनच्या पिकात शेतकºयाने मागितलेल्या ९३०५ या वाणाचे प्रमाण केवळ ३० टक्के तर इतर वाण ७० टक्के वाण असल्याचे त्यांना आढळुन आले.यामध्ये ९३०५ हे लवकर येणारे व अधिक उत्पन्न देणारे असून सध्यास्थितीत या वाणाच्या झाडांना शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. येत्या महिन्याभरात ९३०५ वाण काढणीवर येईल तर इतर वाणाची झाडे हिरवी राहतील यामध्ये सोंगणी करतांना पंचायत होणार आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्याने १ लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.