शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

संकटकाळी वाचवणारे जादुई ‘बूट’ !

By admin | Updated: October 3, 2016 21:21 IST

तुमच्या पायात असे बूट आहेत की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही संकटात असाल, तर त्याची माहिती तुमच्या निकटवर्तीयांना ताबडतोब मिळू शकते किंवा त्या बुटांमुळे तुम्ही कोठे आहात

ऋचिका पालोदकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 3 - तुमच्या पायात असे बूट आहेत की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही संकटात असाल, तर त्याची माहिती तुमच्या निकटवर्तीयांना ताबडतोब मिळू शकते किंवा त्या बुटांमुळे तुम्ही कोठे आहात, याचा शोध घेणे सोपे होऊ शकते. अशा स्वप्नवत वाटणा-या ‘विथ यु- शू’ बूटांची निर्मिती येथील सतरा वर्षीय युवा संशोधक साहस दिनेश चितलांगे याने केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे हरवणे, अपहरण, महिलांवरील अत्याचार यांसारख्या कित्येक प्रकारांमध्ये हे बूट अत्यंत उपयोगी ठरू शकतात. कॉम्प्युटर एडेड डिझाइनची मदत घेऊन साहसने  बुटांचे हे मॉडेल तयार केले आहे. सुचना देणारी चिप, माहिती आदान- प्रदान करणारे लवचिक अँटेना, लिथियम आयोन बॅटरी, तसेच चार्जिंग मेकॅनिझमचा वापर करून बनविण्यात आलेले हे बूट सर्वसाधारण बूटांसारखेच दिसतात.  या बुटांची निर्मिती अशाप्रकारे करण्यात आली आहे की, बूट घातलेला व्यक्ती संकटकाळी इतर व्यक्तींच्या नकळत एक विशिष्ठ टॅप करून आपला संदेश सहज पाठवू शकतो. या संदेशात तो कोठे आहे, याचा पत्ताही आपोआप पाठवला जातो. तसेच बूट घालणा-या व्यक्तीचे नातेवाईकही शंका आल्यास त्याचा शोध घेऊ शकतात. या दुहेरी उपयोगामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना, लहान मुलांचे हरवणे किंवा अपहरण यांसारख्या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल, असे साहसने सांगितले. संरक्षण विभागातही या बुटांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. या बुटांचा वापर करून कंट्रोल रूममधून सैनिकांच्या स्थितीबाबत रणनिती आखणे शक्य होऊ शकते. साहसचे हे तंत्रज्ञान बाजारात आले तर यामुळे नक्कीच एक क्रांती घडू शकते. हे बूट तयार करण्यासाठी त्याला रू. ५००० एवढा खर्च आला. या बुटांना चार्ज केल्यानंतर सात दिवसांपर्यंत त्याची बॅटरी चालते. वायरलेस चार्जर पॅडचा उपयोग करूनही हे बूट चार्ज करता येतात. साहसचे हे ‘विथ यु शू’ आंतरराष्ट्रीय बाजारात सुरक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी साहसच्या नावे पेटंट तयार करण्यासाठी मदत केली आहे.  त्याने कुंडीचा उपयोग करून मिट्टीकुल फ्रीज, सायकलवर बॅटरीचा वापर करून ‘मिनी इ-बाईक’, वॉटर लेव्हल कंट्रोलर, डे-नाईट लाईट सेन्सर, अ‍ॅन्टी थेप्ट डोअर अलार्म आदी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. आय. आय. टी बॉम्बे तर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या  ‘टेक फेस्ट’ स्पर्धेसाठी झोनल लेवल मधे साहस व त्याच्या टीमची निवड झाली आहे.