शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीत भरली मधुशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2017 21:30 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीमध्ये मधुशाळा भरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि 27 : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीमध्ये मधुशाळा भरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बालभारतीच्या इमारतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मद्य पार्टी केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यानी दिलीे. बालभारतीच्या स्थापनेला शुक्रवारी (दि.२७) पन्नास वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्त बालभारतीच्या आवारात २३ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर मद्य पार्टीचा प्रकार २४ तारखेला सायंकाळी घडला आहे. त्यावेळी बालभारतीचे संचालक डॉ. सुनिल मगर सरल या संगणक प्रणालीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना याबाबत दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली. हा प्रकार समोर आल्यामुळे संस्थेच्या पन्नाशीला गालबोट लागले आहे. मद्य पार्टी झाल्याचे मान्य करीत डॉ. मगर म्हणाले, हा प्रकार २४ जानेवारीला सायंकाळी घडला आहे. एक अधिकारी मद्य पिऊन गेस्ट हाऊसमधील रुमबाहेरील जागेतच पडला होता. चौकशीमध्ये हा अधिक्षक स्तरावरील अधिकारी असल्याचे पुढे आले आहे. सध्या एकाच अधिकाऱ्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये आणखी कोण अधिकारी व कर्मचारी सहभागी होते का, याबाबत चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीत जो अधिकारी दोषी आढळला आहे, त्याला शनिवारी सकाळपर्यंत निलंबित करून विभागीय चौकशी केली जाईल. तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच गेस्ट हाऊससाठी एका अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती डॉ. मगर यांनी दिली. दरम्यान, बालभारतीमध्ये यापुर्वीही अनेकदा मद्यपार्ट्या झाल्याची चर्चा सुरू आहे. गेस्ट हाऊसमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पार्ट्या रंगतात. याकडे लक्ष वेधले असता डॉ. मगर यांनी माहिती घेणार असल्याचे सांगितले.