शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगर रेल्वे स्थानकाचा कारभार कट्ट्यावरून

By admin | Updated: January 12, 2016 00:41 IST

स्थानकाचा सांगाडा शिल्लक : अज्ञातांनी केली प्रचंड मोडतोड; तिकीट विक्रेत्यास बसायला नाही जागा--लोकमत विशेष

सचिन लाड --सांगली  माधवनगर... सांगलीपासून चार किलोमीटर अंतरावरचे गाव... गावाबाहेर रेल्वेस्थानक आहे. दुर्गम भागातील अतिशय दूरवस्थेतील एखाद्या स्थानकालाही लाजविण्याचे काम आता या स्थानकाने सुरू केले आहे. स्थानकाचे दरवाजे, खिडक्या, पत्रे पळवून नेले आहेत. तिकीट विक्रेत्यास बसायलाही जागाही नाही. प्रवाशांना बसायला ठेवलेले कट्टेही फोडले आहेत. त्यामुळे तिकीट विक्रेत्यास एखादा दगड शोधून किंवा मोडकळीस आलेल्या कट्ट्यावर बसून तिकीट विक्री करावी लागत आहे. स्थानकाचा तर केवळ सांगाडाच शिल्लक आहे.माधवनगर रेल्वेस्थानक जकात नाक्यापासून दोन-अडीच किलोमीटरवर असल्याने, प्रवाशांसाठी ते नेहमीच गैरसोयीचे ठरले आहे. येथे केवळ सकाळची कोल्हापूर-पुणे, सातारा-कोल्हापूर व सायंकाळची पुणे-कोल्हापूर आणि कोल्हापूर-पुणे या चारच पॅसेंजर थांबतात. पॅसेंजरला तिकीट दर कमी असल्याने या रेल्वेना प्रवाशांची गर्दी असते. स्थानकाची स्वतंत्र इमारत आहे. यामध्ये स्टेशन मास्तर, तिकीट विक्रेता यांच्यासाठी दोन स्वतंत्र खोल्या व प्रवाशांना बसण्यासाठी प्रतीक्षालय आहे. तिकीट विक्रेता पूर्वीपासून येथे पॅसेंजर रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर यायचा. तिकीट दिले; रेल्वे येऊन गेली की, विक्रेता निघून जायचा. त्यामुळे अन्य वेळी हे स्थानक बेवारस असते. हीच संधी साधून चोरट्यांनी स्थानकात धुमाकूळ घातला. खिडक्या, दरवाजे, छताचे पत्रे पळवून नेले. सिमेंटची बाकडी होती. तीही फोडण्यात आली आहेत. पावसाळ्यात तर प्रवाशांना पावसातच रेल्वेची प्रतीक्षा करीत उभे रहावे लागते. तिकीट विक्रेता आजही नेहमीप्रमाणे रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर येतो. रविवारी सायंकाळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने स्थानकास भेट दिली. त्यावेळी दोन महिलांसह सहा प्रवासी उभे होते. ‘तिकीट द्यायला कोणी येतं का?’ अशी त्यांच्याकडे चौकशी केली असता, ‘मास्तर आता एवढ्यात येईल’, असे या प्रवाशांनी सांगितले. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी पॅसेंजर येणार होती. तिकीट विक्रेता साडेपाच वाजता आला. स्थानकात बसण्याची कोणतीच सुविधा शिल्लक नसल्याने, विक्रेता तुटक्या-फुटक्या बाकावर बसला. लगेच प्रवासी त्याच्याजवळ गेले. सर्वांनी तिकीट काढले. त्यानंतर या प्रतिनिधीने विक्रेत्याशी संवाद साधला असता, प्रकाश जावीर असे त्याचे नाव समजले. ते मूळचे सांगोल्याचे आहेत. तिकीट विक्रीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे ते नोकरी करतात. जावीर यांच्या हातात एक बॅग होती. बॅगेत प्लॅस्टिकचा बॉक्स होता. त्यामध्ये पूर्वीची जुन्या पद्धतीची पुठ्ठ्याची तिकिटे होती. केवळ रोजच्या तारखेचा शिक्का मारून तिकीट दिले जाते. सर्व स्थानके संगणकीकृत झाली आहेत. सर्वत्र तिकीट संगणकावर दिले जाते. पण या स्थानकात पुठ्ठ्याची तिकिटे दिली जातात. रेल्वे येण्यापूर्वी सकाळी दोन तास आणि सायंकाळी एक तास या वेळेतच तो तिकीट विक्री करून जातो.लाखाचा गल्ला पुणे आणि कोल्हापूर मार्गावर जाण्यासाठी प्रवाशांची दररोज सकाळी गर्दी असते. अडीच ते तीन हजार रुपयांची तिकीट विक्री येथे होते. सायंकाळी दोन-अडीचशे रुपयांची तिकीट विक्री होेते. यातून महिन्याला एक लाख रुपये गल्ला जमा होतो. या स्थानकाच्यादृष्टीने उत्पन्न चांगले असूनही रेल्वे प्रशासन हे स्थानक सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.