शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मा. गो. वैद्यांकडून बंडखोर स्वयंसेवकांचे समर्थन

By admin | Updated: February 7, 2017 19:47 IST

मनपा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 7 -  मनपा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे. मात्र स्वयंसेवकांच्या या पावलाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दबक्या आवाजात समर्थनदेखील करत आहेत. संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ विचारक मा. गो. वैद्य यांनीदेखील अप्रत्यक्षरीत्या या उमेदवारांचे समर्थनच केले आहे. प्रत्येकाला मत देण्याचे स्वातंत्र असून एकाच राजकीय पक्षालाच स्वयंसेवकांनी मतदान करावे असे संघ सांगत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. संघ स्वयंसेवक केवळ भाजपाशीच बांधील असतात, असा समज आहे. मात्र संघ स्वयंसेवकांची केवळ एकाच पक्षाशी बांधिलकी नाही. तसेच एकाच राजकीय पक्षाला मत द्यावे, असे संघ स्वयंसेवकांना सांगत नाही. प्रत्येकाला मत देण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा स्थितीत संघाने कुणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. स्वयंसेवक राजकारणात जाऊ शकतात. निवडणूक लढावी की नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.