शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलांचे लग्न लावून सरकारने सुरक्षित घर द्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 04:29 IST

आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने प्रेमी युगुलास वा त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यासह दिला जाणारा छळ

नवी दिल्ली : आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने प्रेमी युगुलास वा त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यासह दिला जाणारा छळ कसा रोखावा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक, सुधारक व दंडात्मक असे अनेक निर्देश दिले आहेत. संसदेने योग्य कायदा करेपर्यंत यांचे पालन करणे सर्व राज्यांना बंधनकारक असून, त्यासाठी व्यवस्था करण्यासाठी राज्यांना सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.काही महत्वाचे निर्देश प्रतिबंधक उपाय : गेल्या पाच वर्षांत ‘आॅनर किलिंग’च्या वा खाप पंचायतींनी बळजबरी केल्याच्या घटना घडल्या, अशी ठिकाणे हुडकून त्याकडे लक्ष द्यावे. खाप पंचायतीची बैठक बैठक होणार नाही यासाठी पोलिसांनी उपाय योजावेत. तरीही बैठक झाल्यास तिला संबंधित पोलीस उप अधीक्षकांनी उपस्थित राहून व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. बैठकीत प्रेमी युगुल वा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात निर्णय होणार नाही, याची खात्री करावी.सुधारक उपायतरीही खाप पंचायत भरून, त्यांनी संबंधितांना शिक्षा करण्याचा निर्णय केल्यास संबंधितांवर गुन्हे नोंदवून अटक करावी. अशा तपासात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे. प्रेमी युगुलास व कुटुंबियांना सुरक्षा देण्याचे उपाय योजावेत. गरजेनुसार त्यांना त्याच वा अन्य जिल्ह्यात हलवावे व धोका दूर होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षित घरे’ उपलब्ध करावीत. प्रेमी युगुल स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम आहे का, याची माहिती घ्यावी. त्यांची इच्छा असल्यास त्यांना लग्नास मदत करावी. लग्नानंतरही गरज असणाऱ्या युगुलास नाममात्र शुल्क आकारून एक वर्षापर्यंत राहण्यासाठी ‘सुरक्षित घर’ मिळवून द्यावे.दंडात्मक उपायआंतरजातीय विवाहामुळे होणाºया त्रासाच्या तक्रारी नोंदवून त्यावर त्वरीत कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष सेल स्थापावा. यात जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा समाजकल्याण अधिकारी असावेत. तक्रार नोंदणी, सल्ला व समुपदेश व संरक्षणासाठी विशेष सेलने अहोरात्र हेल्पलाइन सुरु करावी. आॅनर किलिंग वा प्रतिष्ठेसाठी छळाची प्रकरणे विशेष वा जलद गती न्यायालयांत चालवावीत. रोज सुनावणी घेऊन ती शक्यतो सहा महिन्यांत निकाली काढावी. आधी माहिती मिळूनही अशी घटना न रोखणाºया, घटना घडल्यावर आरोपींना लगेच अटक करून खटले दाखल न करणाºया वा कर्तव्यात कसूर करणाºयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार