शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

Loudspeaker Controversy: प्रियांका चतुर्वेदींनी राज ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 11:51 IST

Loudspeaker Controversy : ''कॉपी करणारे मागेच असतात, हा व्हिडिओ नकलाकारांसाठी एक धडा आहे.''

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सरकारला अल्टीमेटम देऊन मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. यातच शिवसेनेवर निशाणा साधण्यासाठी राज यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये बाळासाहेब भोंगा आणि रस्त्यावरील नमाजाविषयी बोलत आहेत. त्या व्हिडिओला शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी बाळासाहेबांच्या एक व्हिडिओने प्रत्युत्तर दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करत प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले की, "हा खरा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्वत नकलाकारांसाठी  एक धडा आहे. कॉपी करणारे एक पाऊल मागे नाही, तर अनेक पावले मागे असतात." व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, 'मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमची शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता.' 

राज ठाकरेंच्या व्हिडिओत काय ?राज ठाकरे यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर केला होता. 36 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणतात, 'ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील. धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील.'

अजित पवारांचा राज ठाकरेंना सज्जड दमआज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना इशारा दिला. "जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही नोटीस पाठवून खबरदारी घेतली. कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरू नये. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सरकार कायदा व नियमांवर चालत असतं. सर्व धार्मिक स्थळांना समान नियम लागू होईल. यूपीत अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वत:हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. राज्यात जितकी धार्मिक स्थळ आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी", असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे