पुणे : निवडणुकीत पाठिंबा देवूनही विश्वासघात केल्याच्या भावना व्यक्त करत शहरातील सराफांनी रविवारी ‘कमल का फूल, हमारी भूल’ अशी भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करत सराफ संघटनेने लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारूती चौकात धरणे आंदोलन केले.सराफांनी अबकारी कर हटविण्याची मागणी केली. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर तसेच या कायद्यातील जाचक अटींविरोधात राज्यातील सराफांनी बेमुदत बंद पुकारला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार सराफांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका, नितीन अष्टेकर, अभय गाडगीळ आदी आंदोलनात सहभागी झाले होते. संघटनेने पालकमंत्री गिरीष बापट व खा. अनिल शिरोळे यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
‘कमल का फूल हमारी भूल!’
By admin | Updated: March 29, 2016 01:18 IST