शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ५ हजार घरांची  २९ जुलैला निघणार सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:58 IST

दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ९ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० जून रोजी सकाळी १० पासून अर्ज करू शकतील.

मुंबई : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६९ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी गो-लाईव्ह कार्यक्रमांतर्गत सुरुवात झाली. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकरनगर येथील कार्यालयात काढली जाणार आहे.दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ९ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० जून रोजी सकाळी १० पासून अर्ज करू शकतील. १० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज  सादर करता येणार आहे. ११ जुलै रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. १२ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी २१ जुलै रोजी सायंकाळी  ६ वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. 

- सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश- पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका- म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत २७९ सदनिका- प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका- म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २ हजार ६७५ सदनिका. 

टॅग्स :mhadaम्हाडा