शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हरवलेले पाकीट सापडले पंढरपुरातील विठ्ठलाच्या हुंडी पेटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:50 IST

तीन महिन्यांपूर्वीची घटना; पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आली उघडकीस

ठळक मुद्देपंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील हुंडीपेटीतील दान मोजताना त्यांचे पाकीट आढळून आलेवस्तू सापडल्यास मंदिर समितीचे कर्मचारी त्यांना नि:स्वार्थीपणाने परत करताततीन महिन्यांपूर्वी पुणे येथे पाकीट हरवले; मात्र याबाबत मी कोणाकडेही तक्रार केली नव्हती

पंढरपूर : तीन महिन्यांपूर्वी पुणे येथे पाकीट हरवले; मात्र याबाबत मी कोणाकडेही तक्रार केली नव्हती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या हुंडी पेटीत सापडले. पुन्हा हे पाकीट मिळाल्याने आनंद झाला, असे रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

रघुनाथ पुरुषोत्तम कुलकर्णी (रा. औरंगाबाद, सध्या कोथरुड, पुणे) यांचा मुलगा पुणे येथे राहतो. त्यामुळे ते मुलाकडे राहण्यासाठी आले होते. तीन महिन्यापूर्वी त्यांचे पाकीट कोथरुड येथे हरवले होते. त्यामध्ये २ हजार ४१० रुपये, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तसेच मुलाला देखील सांगितले नव्हते.

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील हुंडीपेटीतील दान मोजताना त्यांचे पाकीट आढळून आले. मंदिरातील कर्मचारी संभाजी देवकर, तुकाराम कुलकर्णी, विशाल देवकते, मिलिंद माने यांनी संबंधित कागदपत्राच्या आधारे रघुनाथ कुलकर्णी यांचा मोबाईल नंबर शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून पाकीट व त्याच्यातील वस्तू घेऊन जाण्यास सांगितले, असे मंदिर समितीचे लेखापाल सुरेश कदम यांनी सांगितले.

विठ्ठल गाभाºयात सापडली पैसे असलेली पिशवी- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी नामदेव शीलवंत हे सोमवारी विठ्ठल गाभारा येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना दर्शन रांगेमध्ये ९ हजार १३० रुपयांसह पिशवी सापडली. ती पिशवी पुणे येथील भाविक रत्नमाला सतीश जाधव (वय ६४) यांची असल्याची खात्री करुन त्यांना परत देण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

अनेक भाविक मंदिरात वस्तू, पैसे विसरतात.  त्या वस्तू सापडल्यास मंदिर समितीचे कर्मचारी त्यांना नि:स्वार्थीपणाने परत करतात. त्याच पद्धतीने मंदिराच्या हुंडीपेटीत एक पाकीट सापडले होते. त्याबाबत संबंधित व्यक्तीला संपर्क साधून ते घेऊन जाण्यास सांगितले आहे.- बालाजी पुदलवाड,व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

माझे पाकीट पुणे येथील कोथरुडमध्ये  हरवले होते. ते विठ्ठलाच्या हुंडीपेटीत सापडले हा देवाचा महिमाच समजावा लागेल. याबाबत मला मंदिर समिती कर्मचाºयांकडून संपर्क करण्यात आला आहे.- रघुनाथ कुलकर्णी,पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPuneपुणेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर