शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मान्सूनला खोडा ‘एल निनो’चा

By admin | Updated: June 23, 2014 04:29 IST

यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडत असून त्यामुळे राज्यासह देशभरात अपुरा पाऊस पडला आहे.

पुणे : यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडत असून त्यामुळे राज्यासह देशभरात अपुरा पाऊस पडला आहे. पुणे वेधशाळेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा १८ जूनपर्यंत ४५ टक्के पाऊस कमी पडला आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून अल निनोची स्थिती निर्माण होत असून हा एल निनोच्या प्रभावामुळेच पाऊस कमी पडत असल्याचे तज़्ज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, एल निनोच्या प्रवाहाची ही सुरुवातीची स्थिती आहे. तो पूर्णपणे विकसित होण्यास आणखी चार महिने लागतील आणि तोपर्यंत मान्सून संपलेला असेल. त्यामुळे या घटकाचा फारसा परिणाम होणार नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत दरवर्षी देशभरात ८७.६ मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत तो फक्त २८.७ मिलीमीटर झाला आहे. अलनिनोचा प्रभाव कायम राहिल्यास जून-जुले महिन्यात खूपच कमी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यंदा पाऊस कमी झाल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. अगोदरच कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पाऊसच पडला नाही तर दुष्काळाचे संकट ओढवू शकते. त्यामुळे हवामानतज्ञांचे डोळे समुद्राच्या स्थितीवर रोखले गेले आहेत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट’च्या अभ्यासानुसार, पश्चिम घाटावरील परिस्थिती मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरेल आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतामध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होईल. (प्रतिनिधी)