शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

१७ नंबर फॉर्मसाठी विद्यार्थ्यांची लूट, शाळा, महाविद्यालयांचा उघड धंदा

By admin | Updated: July 10, 2016 21:13 IST

मार्च २०१७ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस (बारावी) नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक १७ नंबर फॉर्म भरणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे

ऑनलाइ लोकमतमुंबई, दि. १० : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या मार्च २०१७ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस (बारावी) नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक १७ नंबर फॉर्म भरणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे. दहावी आणि बारावीसाठी १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाकडून १० ते १५ हजार रुपये उकळले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत आहेत.

मुळात दहावीसाठी १७ नंबर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने १ हजार रुपये नियमित शुल्क ठरवलेले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे किंवा संपर्क केंद्राकडे १० जुलैपर्यंत फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर २०जुलैपर्यंत संपर्क केंद्रांनी १७ नंबर फॉर्म जमा करायचा आहे. २० जुलैनंतर विद्यार्थ्यांना १०० रुपये विलंब शुल्कासह १ हजार १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर २१ जुलैनंतर ५ आॅगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना १ हजार १०० रुपये आणि प्रतिदिन २० रुपये अतिविलंब शुल्क आकारले जाईल, असे मंडळाने सांगितले.

बारावीसाठीही खागगी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाकडे नोंदणी करण्यासाठी १० जुलैची मुदत असून त्यासाठी केवळ ५०० रुपये शुल्क आहे. त्यानंतर २० जुलैपर्यंत ५२५ रुपये विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना १७ नंबरचा फॉर्म भरता येईल. शेवटी संधी म्हणून खाजगी विद्यार्थ्यांना २१ जुलै ते २० आॅगस्टपर्यंत ५२५ रुपये आणि प्रतिदिन २० रुपये अतिविलंब शुल्कभरून १७ नंबरचा फॉर्म भरण्याची व्यवस्था मंडळाने केली आहे...................अज्ञानाचा फायदाखाजगी विद्यार्थ्यांना १७ नंबर फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काची रक्कम याची माहिती मंडळाने संकतेस्थळावर दिलेली आहे. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसल्याचा फायदा काही शाळा आणि महाविद्यालये घेत आहेत. वर्ष वाया जाऊ नये, म्हणून विद्यार्थिही या आर्थिक पिळवणूकीला बळी पडत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे याबाबतच एकही तक्रार मंडळ किंवा शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे होत नसल्याचे निदर्शनास आले....................पुराव्यानिशी तक्रार करादहावीसाठी १७ नंरचा फॉर्म भरताना शाळा प्रशासनाने अधिक पैशांची मागणी केल्यास पुराव्यानिशी मंडळाकडे तक्रार करा, अशी प्रतिक्रिया विभागीय मंडळाचे सचिव सि.या. चांदेकर यांनी दिली. तर कोणत्याही महाविद्यालयाने शुल्काहून अधिक पैशाची मागणी केल्यास त्यांची तक्रार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे करण्याचे आवाहन उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे. अशा केंद्रांकडून खुलासा मागवून ते दोषी आढळल्यास त्यांचे केंद्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.