शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

तापल्या ऊन्हात रांगा वाढल्या....टॅक्सीवाले, रिक्षावाले गेले तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 17:31 IST

भर उन्हाळ्यात टॅक्सी आणि रिक्षाचालकांचा पत्ता नसल्याने सामान्य प्रवाशी त्रस्त झाले. तापत्या उन्हातील वाढत्या रांगांमागे नेमके कारण काय?

तुम्ही जर मुंबई, ठाण्यात रहात असाल तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा मिळणे अधिकच कठिण झाल्याचे लक्षात आले असेल. राज ठाकरेंच्या मनसेचे काही खळखटॅक सुरु नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी रिक्षा तोडफोडीची नवी मोहीम सुरु केलेली नाही तरीही टॅक्सी, रिक्षा का वेळेवर मिळत नाही, हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल. डोक्यावर तापत्या ऊन्हात उभे राहून टॅक्सी-रिक्षांची वाट पाहताना जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त टॅक्सी, रिक्षा कुठे गायब झाल्या यी विचारानं तुमचे डोके अधिकच तापलेही असेल.

www.lokmat.com ने गायब झालेल्या टॅक्सी-रिक्षांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. काही चालकांशी संवाद साधला तेव्हा लक्षात आले नोकरदार जसे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेरगावी जातात. आपल्या गावी जातात तसेच टॅक्सी-रिक्षा-टॅक्सीचालक दीर्घ काळासाठी जात असतात. रामनरेश गुप्ता या कांदिवलीच्या रिक्षाचालकाने दिलेली माहिती खूपच धक्कादायक. तो म्हणाला, आमच्या एका स्टॅण्डवर १४३५ रिक्षा आहेत. त्यापैकी सध्या ७०० रिक्षाही धावत नाहीत. त्यांच्या स्टॅण्डवरचे बहुसंख्य रिक्षाचालक लग्नासाठी तर काही इतर काही कामांसाठी गेले आहेत. रिक्षा टॅक्सी चालवणारे मुख्यत्वे उत्तर भारतीय आहेत. मे-जून हे दोन महिने उत्तरप्रदेश-बिहारसाठी लग्नाच्या मुहुर्तांचे. संयुक्त कुटुंबातून आलेल्या या उत्तरभारतीयांना कौटुंबिक कार्यक्रमांना त्यातही लग्नसोहळ्यांना जाणे एकप्रकारे बंधनकारकच असते. जर घरातील कुणी नातेवाईकांच्या लग्नास हजेरी लावली नाही तर ते अपमानास्पद मानले जाते. त्या कुटुंबाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे उत्तरभारतीय परवडो न परवडो लग्नसोहळ्यासाठी उत्तर भारतातील गावी जातातच जातात. आताही तसेच घडले आहे. त्यामुळे तुम्ही टॅक्सी शोधाल तर मिळत नाही. नेहमीच लवकर न मिळणारी रिक्षा आणखी वेळ खाते आहे. सुभाष ठाकूर या टॅक्सीचालकाच्या मते उत्तरप्रदेशात जाणे सोपे नसते, आधी तिकिटच मिळत नाही. मिळाले तरी ते वेळेत मिळेल असे नाही. त्यात पुन्हा येण्यासाठी लागणारा काही दिवसांचा वेळ लक्षात घेऊन आमची लोकं फुर्सतनेच जातात. एकदा गेले की मग्न लग्नसोहळे, घराची डागडुजी तसेच शेतीचीही काही कामे उरकतात. त्यामुळे किमान महिनाभर तरी फटका बसतो. त्यामुळे आता टॅक्सी-रिक्षा नेहमीप्रमाणे वेळेवर मिळत नसेल तर उगाच डोके तापवू नका. शांत रहा. रागाला सुट्टी दिल्याशिवाय पर्यायच नाही. कारण टॅक्सी-रिक्षाच सुट्टीवर आहेत.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकMumbaiमुंबईthaneठाणे