शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:49 IST

Mumbai Traffic: आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईत येत असल्यामुळे शनिवारी सकाळीही वाशी खाडीपुलावर चक्काजाम झाला.

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईत येत असल्यामुळे शनिवारी सकाळीही वाशी खाडीपुलावर चक्काजाम झाला हाेता. मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना नवी मुंबईत वाहने थांबवून रेल्वेने येण्याचे आवाहन केले. तसेच मुंबईतील अवजड वाहनांची वाहतूकही थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सायन-पनवेल महामार्गावर शनिवारी पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत  वाहतूक कोंडी वाढली होती. सकाळी नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमध्ये आंदोलकांच्या वाहनांची भर पडल्यामुळे कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जास्त कुमक तैनात केली. 

मुंबईच्या हद्दीत मानखुर्द जकात नाक्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी आंदोलकांची वाहने अडवून पुन्हा नवी मुंबईत पाठविण्यास सुरुवात केल्यामुळे वाहतूक  कोंडीत काहीवेळ भर पडली होती. जवळपास तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. आंदोलकांनी वाहने मुंबईत घेऊन जावू नये. वाहने नवी मुंबईत उभी करून रेल्वेने आझाद मैदानावर पोहचावे, असे आवाहन केले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधकाम साहित्य घेउन जाणारे डंपर व इतर अवजड वाहनांना वाशी खाडी पुलावरून प्रवेश बंद केला आहे. अवजड वाहतूक बंद केल्यामुळे ही वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

२४ तास बंदोबस्त नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाशी खाडीपुलासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यालय व इतर ठिकाणचे कर्मचारी वाशी वाहतूक विभागाकडे वळविण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी चोवीस तास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही वाहतूक पोलिसांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र