राजू शेट्टी यांचा सज्जड इशारा : जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत रण्शिंग फुंकले
कोल्हापूर : यंदाच्या हंगामात शेतक:यांना एकरकमी 27क्क् रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर झालेल्या तेराव्या विराट ऊस परिषदेत दिला. या परिषदेत उचलीची मागणी करून शेट्टी यांनी यंदाच्या हंगामातील ऊस आंदोलनाचेच रणशिंग फुंकले.
शेट्टी म्हणाले, ‘आम्ही 24 नोव्हेंबर्पयतची मुदत कारखानदार व राज्य सरकारलाही देत आहोत. तोर्पयत त्यांनी उचलीबाबत निर्णय द्यावा; अन्यथा 25 नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्त कार्यालयास घेराव घालू. आम्ही लगेच उद्यापासून आंदोलन करणार नाही; परंतु आंदोलनाशिवाय शेतक:यांना न्यायच मिळणार नसेल तर राज्य सरकारलाही गदगदा हलविण्याची ताकद राजू शेट्टी यांच्यामध्ये आहे, हे ध्यानात घ्यावे.’ विधानसभा निवडणुकीत संघटनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने यंदाची परिषद कशी होते, याबद्दल लोकांत उत्सुकता होती; परंतु आजर्पयतच्या सगळ्या परिषदा जशा झाल्या, तशीच अत्यंत उत्साही वातावरणात ही परिषद झाली. (प्रतिनिधी)
आता नागपूर..
ऊसदरासाठी आम्ही यापूर्वी इंदापूर, बारामती, क:हाडला आंदोलन केले आहे. आता नवे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांचे अभिनंदन केले व त्यांना माङया मनातील भीती बोलून दाखवली. साखर हंगाम सुरू होत आहे व त्यात सरकारने शेतक:यांच्या हिताची भूमिका घेतली पाहिजे. ती सरकार घेणार नसेल तर नाइलाजाने आम्हाला नागपूरला आंदोलनासाठी यावे लागेल, असाही इशारा शेट्टी यांनी या परिषदेत दिला.
मी कॅबिनेट मंत्री - जानकर
भाजपाच्या सरकारमध्ये घुसण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे; परंतु आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठीच आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. त्यांचीही सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी आहे. पुढील आठवडय़ात मी जेव्हा येईन तेव्हा मी कॅबिनेट मंत्री असेन, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परस्पर जाहीर केले.