शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा धरण भरले; इंद्रायणी काठच्या गावांना सतर्कतेचे इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 08:31 IST

लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 23 -  लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे. 
     टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून भिवपुरी येथील वीज निर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. मात्र खोपोली व रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला असल्याने लोणावळा धरणातील पाणी रायगड जिल्ह्यात न सोडता लोणावळ्यातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे पत्र टाटा कंपनीने मावळ प्रशासनाला दिले आहे. या पत्राचा हवाला देत तहसिलदार रणजित देसाई यांनी सर्व पोलीस व प्रशासकीय यंत्रणांना याबाबत सुचित करुन नदीकाठच्या घरांना व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत कळविले असून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात यावे असे सूचित केले आहे. वास्तविक लोणावळ्यातून वाहणार्‍या इंद्रायणीला देखील सर्वत्र पुर आला आहे. असे असताना या नदीपात्रात पाणी सोडल्यास लोणावळा शहरात पाणी घुसण्याची भीती वर्तवली जात आहे.