वाशिम: लोकमतने नेहमीच लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली आहे. लोकमत संस्काराचे मोतीच्या माध्यमातून लहान मुलांना वाचनाची सवय लागावी याकरिता दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमात सहभागी होण्यार्या विद्यार्थ्यांना हवाई सफर करण्याची संधी लोकमतने दिली आहे. याकरिता अकोला व खामगाव येथील दोघांची निवड करण्यात आली आहे. लोकमत संस्काराचे मोती या उपक्रमाचा एक भाग म्हणून अकोला व खामगाव शहरातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात स्मित सुधीर सोमवंशी अकोला व आदित्य राजेंद्र देशमुख खामगाव यांचा समावेश असून त्यांना लवकरच नागपूर ते दिल्ली व दिल्ली ते नागपूर विमानाने प्रवास करण्याची संधी लोकमततर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. लोकमतच्या या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे. याहीवर्षी संस्काराचे मोती या उपक्रमाअंतर्गत अशीच संधी लोकमतच्या वतीने तीन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लोकमतची हवाई सफर लवकरच!
By admin | Updated: July 2, 2014 00:50 IST