शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे आयकॉन्स हेच खरे ‘सिंघम’

By admin | Updated: November 21, 2014 01:16 IST

अजय देवगण यांचे गौरवोद्गार : कोल्हापूर येथील शानदार सोहळ्यात ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’चे प्रकाशन

कोल्हापूर : शून्यातून सुरुवात करत समाजाप्रती कृतज्ञता ठेवून काम करत असलेले ‘लोकमत’चे दक्षिण आयकॉन्स हेच खरे ‘सिंघम’ आहेत, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांनी काढले. दक्षिण महाराष्ट्रातील कर्तृत्ववानांचा जीवनपट रेखाटणाऱ्या ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर येथे रंगलेल्या या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यास महापौर तृप्ती माळवी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उद्योगपती संजय घोडावत, बीग ड्रीमचे संचालक संजय कुंभार आणि ‘लोकमत’ मीडिया ग्रुपचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. ‘लोकमत’ कोल्हापूरच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील प्रांगणात रंगलेल्या या सोहळ्यास कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित होते. देवगण म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये खूप आदर्शवादी काम करत असतो. मी चित्रपटातील बाजीराव सिंघम असलो तरी ‘लोकमत’च्या कॉफी टेबल बुकमधील आयकॉन्स हेच खरे सिंघम आहेत. चित्रपटातील भूमिकांबाबत प्रेक्षक आमची वाहवा करतात, पण शून्यातून सुरुवात करत समाजाप्रती कृतज्ञता ठेवून काम करणाऱ्या या आयकॉन्सबाबत समाजाने कृतज्ञ राहायला हवे. त्यांना समाजासमोर आणून ‘लोकमत’ने मोठे काम केले आहे. खासदार दर्डा म्हणाले, ‘लोकमत’च्या दक्षिण महाराष्ट्र कॉफी टेबल बुकमधील आयकॉन्सनी महाराष्ट्राला समृद्ध केले. सर्वसामान्यांचे जीवनमान बदलले आणि नव्या पिढीत विश्वास जागविला आहे. त्यांचा हा प्रयत्न आम्ही समाजासमोर आणला आहे. त्यातून नव्या पिढीला दिशा मिळेल, असा विश्वास आहे. प्रास्तविकात कॉफी टेबल बुकमागील संकल्पना मांडताना ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, ‘यातील आयकॉन्स म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवनपट आहे’. या बुकमधील ५१ व्यक्तिमत्त्वे म्हणजे ‘रत्ने’च म्हणावी लागतील असे त्यांचे जग आहे.मान्यवरांची उपस्थितीश्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर तृप्ती माळवी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, निवृत्त पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव, मेनन उद्योग समूहाचे सचिन मेनन, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक भोईटे, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, बॅँक आॅफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापक राजमणी गणेशन, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, माजी महापौर सई खराडे, नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील, महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, शाहू साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरुपा यड्रावकर, वीरेंद्र संजय मंडलिक, गार्डियन हॉलिडेजचे कृष्णात दिवटे, परेश हातकर, टिंबर मार्केट असोसिएशनचे सचिव हरिभाई पटेल, ‘टिंबर मार्केट लघुउद्योग’चे अध्यक्ष वसंतराव देशमुख, रमेश लालवाणी, महाभारत कन्स्ट्रक्शनचे जयेश कदम, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, फायनान्स आॅफिसर शाम कोले, शिवदत्त असोसिएटस्चे अजय डोईजड, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, वारणा दूध संघाचे सचिव के. एम. वाले, जे. जे. मगदूम इंजि.चे जनसंपर्क अधिकारी एस. आर. यादव, सायरस पुनावाला स्कूल पेठवडगावचे प्राचार्य सरदार जाधव, गडहिंग्लजच्या रवळनाथ हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष अनिल चौगुले, युनिक आॅटोचे सुधर्म वाझे, अ‍ॅड एजन्सीज- ‘आस्मा’चे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुदगल, अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे संचालक डॉ. के. रवी, फायर इंजिनिअरिंग कॉलेजचे युवराज पाटील, किरण पाटील, चाटे क्लासेसचे भारत खोराटे, द्वारकादास शामकुमारचे जुगलभाई बुब, जाधव इंडस्ट्रीजचे चंद्रकांत जाधव, सिद्धिविनायक कम्युनिकेशनचे सत्यजीत जाधव, शिवगंगा ट्रेडर्सचे सुरेश काशीद, रॉयल ब्ल्यूचे मनोज कोळेकर, उद्योगपती हरिष बोहरा, आंबुबाई पाटील स्कूलचे के. डी. पाटील, ‘आसमा’चे अध्यक्ष व संपर्क अ‍ॅड एजन्सीचे मोहन कुलकर्णी, मल्टिप्रिंटचे कौस्तुभ नाबर, जयेंद्र पब्लिसिटीचे प्रशांत कुलकर्णी, लुकतुके पब्लिसिटीचे सुहास लुकतुके, पॅन्थर पब्लिसिटीचे शरद पाटील, क्लायमॅक्स अ‍ॅड एजन्सीचे उदय जोशी, इंटरट्रेड अ‍ॅड एजन्सीचे सलीम देवळे, अस्लम देवळे, अभय पब्लिसिटीचे अभय मिराशी, झेड क्रिएशनचे लियाकत नाईक, इंप्रिशन पब्लिसिटीचे सुनील बनगे, सातारा जिल्ह्यातील हणमंतराव चव्हाण, सौ. राजश्री चव्हाण, डॉ. अनिरुद्ध जगताप, सलीम कच्छी, डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. नेहा दांडेकर, दिलीपभाई दोशी, प्रसाद दोशी, नदीम शेख, सौ. रुबीना शेख, चंद्रशेखर चोरगे, संकेत चोरगे, अभिजीत पिसाळ, विपुल शहा, नितीन बनवणे, जयंत गुजर, डॉ. सौ. जयश्री सुरेश शिंदे, फत्तेसिंग सरनोबत, एन. व्ही. देशपांडे, गुरुप्रसाद नाईक, आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.विमानतळावर उत्साही स्वागततत्पूर्वी, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व खासदार विजय दर्डा व अभिनेते अजय देवगण यांचे बुधवारी सकाळी विमानतळावर उत्साहात स्वागत झाले. उजळाईवाडी विमानतळावर सकाळी नऊच्या सुमारास विमानाने खासदार विजय दर्डा व अजय देवगण यांचे आगमन झाले. महापौर तृप्ती माळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, ऋतुराज संजय पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे, कॉँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, ‘लोकमत’ कोल्हापूरचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, मनुष्यबळ व प्रशासनचे व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, मुख्य बातमीदार विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’ सखी मंचच्या महिला सदस्यांनी खा. दर्डा आणि देवगण यांचे औक्षण केले. दक्षिण महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा समावेश असणारे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, अभिनेते अजय देवगण, लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, उद्योगपती संजय घोडावत, ‘बीग ड्रीम’चे संचालक संजय कुंभार व महापौर तृप्ती माळवी. कोल्हापुरात ‘लोकमत’च नंबर १‘लोकमत’ आता कोल्हापूर शहरातही प्रथम क्रमांकाचे दैनिक झाले आहे, हे सांगताना मला आनंद वाटतो आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीत आणि प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या मान्यवरांना ‘आयकॉन आॅफ दक्षिण महाराष्ट्र’ या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून पुढे आणले. ‘लोकमत’ केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरतीच मर्यादित पत्रकारिता करीत नाही, तर या प्रदेशातील मातीशी एकरूप झाला आहे. येथील जनतेच्या सुखदु:खाचा तो भागीदार बनला आहे़ त्यामुळेच आयकॉन्स या कॉफीटेबल बुकमधून समाजातील कर्तृत्वानांचे कार्य लोकमत तर्फे पुढे आणले जात आहे़- खासदार विजय दर्डातुतारींच्या निनादात मान्यवरांचे स्वागतकार्यक्रमाची वेळ सकाळी साडेदहा वाजता होती; पण पावणेदहा वाजल्यापासूनच ‘आयकॉन्स’ व त्यांचे कुटुंबीयांचे आगमन होत होते. त्यांचे ‘लोकमत’च्या प्रवेशद्वारातच तुतारीच्या निनादात स्वागत झाले. यामुळे उत्साह संचारला. पोवाड्याने संचारला उत्साहअजय देवगण, विजय दर्डा यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन होताच ‘विटी दांडू’ या चित्रपटातील उदेश उमप यांनी गायिलेल्या पोवाड्याने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. ‘लोकमत’च्यावतीने महालक्ष्मीची प्रतिमा देऊन विजय दर्डा यांनी अजय देवगण यांचा सत्कार केला. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी ‘विटी दांडू’चे दिग्दर्शक विकास कदम यांचा सत्कार केला.