शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ सोहळ्याला ‘ग्लोबल’ पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:32 IST

इस्त्रायलचे नोहा मस्सील आणि ‘मायबोली’ परिवाराला विशेष पुरस्कार .  ‘मायबोली परिवार’ यवर्षीच्या  ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन पुरस्कारा’चा मानकरी. जगभरातल्या 13 देशांमधून 25 महाराष्ट्र मंडळांचा सहभाग

ठळक मुद्दे यावर्षीचा ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन’ सन्मान पोचला जेरुसलेमच्या पवित्र भूमीत

मराठी मुळे असलेल्या ‘बेने इस्त्रायली’ परिवाराने दूर राहूनही आपल्या मूळ भूमीशी नाते घट्ट ठेवले आहे. गेली कित्येक वर्षे जेरुसलेम आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये परस्पर स्नेहाचे पूल उभारून त्यावरची वर्दळ अखंड राहावी म्हणून प्रयत्न करणारे नोहा मस्सील आणि त्यांचा  ‘मायबोली परिवार’ यवर्षीच्या  ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन पुरस्कारा’चा मानकरी ठरला.जेरुसलेमहून प्रकाशित होणारे  ‘मायबोली’ हे मराठी त्रैमासिक यंदा पंचवीस वर्षाचे झाले. इस्त्रायलहून प्रसिध्द होणारे हे त्रैमासिक भारतासह युरोप आणि अमेरिकेतही पोचले आहे.काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू न शकलेले नोहा मस्सील आणि  ‘मायबोली परिवारा’च्या वतीने हा सन्मान मायबोलीच्या सहायक संपादक एलिझाबेथ डेव्हीड यांनी स्वीकारला.

***महत्त्वाकांक्षा आणि संधींच्या शोधात माणसे  मातृभूमीचा किनारा सोडून परदेशी जातात, तिथे वास्तव्य करतात, कर्तृत्वाचे पंख विस्तारतात आणि परक्या मातीत आपली मुळे घट्ट रुजवतात, तरीही मायदेशाची आठवण त्यांच्या हरेक श्वासात असते. याच अखंड सोबतीचे प्रतीक म्हणजे यावर्षीच्या  ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ सोहळ्याला लाभलेली जगभरच्या मराठी माणसांची साथ!एकूण चौदा देशांतल्या पंचवीस महाराष्ट्र मंडळांनी  यावर्षीच्या सोहळ्यात सक्रीय सहभाग घेतला. यावर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाईन मतदानातही परदेशी वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला.उत्तर अमेरिकेतली एकूण अकरा महाराष्ट्र मंडळे या कार्यक्रमासाठी सहयोगी म्हणून सहभागी झाली होती.त्यामध्ये मराठी मंडळ- लॉस एंजेलीस, महाराष्ट्र मंडळ- शिकागो, सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ, डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ, कोलोरॅडो मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ -क्लिव्हलॅण्ड ओहायो, अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ, ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ, शार्लट मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ - बे एरिया आणि बफेलो मराठी मित्र परिवाराचा समावेश होता.युरोपमधून एकूण आठ महाराष्ट्र मंडळांनी यावर्षीच्या सोहळ्यात सहभाग घेतला. त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ- लंडन, स्लाव्ह मित्र मंडळ-युनायटेड किंगडम, इल्फर्ड मित्रमंडळ- लंडन, महाराष्ट्र मंडळ- फ्रान्स, महाराष्ट्र मंडळ-म्युनिक, महाराष्ट्र मंडळ-नेदरलॅण्ड्स, बेल्जियम मराठी मंडळ-ब्रसेल्स, महाराष्ट्र मंडळ - डेन्मार्क यांचा सहभाग होता. शेजारी चीनमधले शांघाय मराठी मंडळ, जपानमधले तोक्यो मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ - मलेशिया, मराठी मंडळ बॅँकॉक-थायलंड, महाराष्ट्र मंडळ- मस्कत आणि इस्त्रायलचा मायबोली परिवार यांनीही यावर्षीच्या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला. ***