शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

LMOTY 2019: हुबेहूब डॉ. काशिनाथ घाणेकर घडवणारे विक्रम गायकवाड यांचा 'लोकमत'कडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 18:50 IST

अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले.

मुंबई - अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. भूमिकेला अस्सलतेचा साज चढवणाऱ्या गायकवाड यांची कारकीर्द एखाद्या चित्रपटाला साजेसी अशीच आहे. पडद्यामागील या अवलिया कलाकाराचे काम प्रेक्षकांना आवर्जून भावते. त्यांच्या याच  कार्याची दखल घेऊन मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

चित्रपट कोणताही असो, विक्रम गायकवाड त्यांच्या रंगभूषेने त्यात जीव ओततात. अगदी काही महिन्यांपूर्वी आलेल्या ''... आणि काशीनाथ घाणेकर'' या चित्रपटातील त्यांच्या कामाची दखल संपूर्ण चित्रपटसृष्टीने घेतली. विशेषतः साठीच्या आणि सत्तरीच्या दशकातले कलाकार आणि त्यांचे पडद्यावरचे दिसणे त्यांनी जणू प्रत्यक्षात आणले. डॉ घाणेकर भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावे यांना केलेला कायापालट प्रति घाणेकर वाटावा इतका जवळ जाणारा होता. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी विक्रम गायकवाड यांनी रंगभूषा केली आहे. हिंदी, इंग्रजीसह त्यांनी काही गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी रंगभूषा केली. त्यात बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली आणि भाई :व्यक्ती की वल्ली यांचा समावेश आहे. 

हे होतं परीक्षक मंडळ

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019