शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: उद्योग क्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल बाबा कल्याणींचा लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:36 IST

ऑटोमोबाईल क्षेत्रातलं आदरणीय व्यक्तीमत्त्व असलेल्या बाबा कल्याणी यांचा लोकमतनं 'बिझनेस इन्फ्लुन्सर अवॉर्ड'नं गौरव केला आहे.

मुंबई: ऑटोमोबाईल क्षेत्रातलं आदरणीय व्यक्तीमत्त्व असलेल्या बाबा कल्याणी यांचा लोकमतनं 'बिझनेस इन्फ्लुन्सर अवॉर्ड'नं गौरव केला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुट्टे भाग महत्त्वाची भूमिका बजावतात. कल्याणी यांची भारत फोर्ज कंपनी मोठ्या वाहनांसाठी लागणारे सुट्या भागांची निर्मिती करते. भारत फोर्जला जागतिक क्षितिजावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव लोकमतनं आज केला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबा कल्याणी यांनी 1972 मध्ये भारत फोर्जमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कल्याणी यांनी ही कंपनी जागतिक स्तरावर नेली. भारतामधून ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित ज्या सुट्ट्या भागांची निर्यात होते, त्यात भारत फोर्जचा वाटा लक्षणीय आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. पुण्यात त्यांच्याकडून प्रथम पुणे शिक्षण संस्था चालवली जाते. 2000 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेनं आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मुलांना शिक्षण देण्याचं मोलाचं कार्य केलं आहे. देशाच्या जडणघडणीत उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा असतो. देशाचा सुपरफास्ट विकास करायचा असल्यास वाहतुकीची उत्तम साधनं गरजेची असतात. हीच गरज ओळखून कल्याणी यांनी भारत फोर्जच्या माध्यमातून या क्षेत्रात भारताला अग्रस्थान ठेवलं. त्यांच्या याच कार्याचा आज लोकमतनं 'बिझनेस इन्फ्लुन्सर अवॉर्ड'नं गौरव केला. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर या सोहळ्याचं हे सहावं वर्ष आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019