शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: मराठा सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये जास्त स्क्रिन्स द्या; सुबोध भावेची मल्टिप्लेक्स चालकांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:50 IST

...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर चित्रपटातील अभिनयासाठी सुबोधचा सन्मान

मुंबई: मराठा चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रिन्स द्या, अशी मागणी अभिनेता सुबोध भावेनं लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात केली. ...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटातील भूमिकेसाठी सुबोध भावेचा लोकमतनं सन्मान केला. त्यावेळी मल्टिप्लेक्स  मूव्हीटाईमचे सीईओ उपस्थित होते. त्यांच्यासमोर सुबोध भावेनं मराठी चित्रपटाला जास्तीत जास्त वेळ  मल्टिप्लेक्समध्ये मिळावा, अशी मागणी केली. मराठी चित्रपटाला अनेकदा प्राईम टाईम मिळत नाही. त्यासाठी मराठी चित्रपटाला बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर सुबोध भावेनं मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रिन्स मिळाव्यात असं मत व्यक्त केलं. 'मूव्हीटाईमचे सीईओ इथे असल्याचं मला कळलं. त्यामुळे मी मराठी चित्रपटसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना सांगू इच्छितो की, मराठी चित्रपटाला जास्त वेळ द्या. त्यामुळे चित्रपट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, मराठी प्रेक्षक चित्रपटाचा भुकलेला आहे,' असं सुबोध म्हणाला. लोकमान्य टिळक, बालगंधर्व यासारख्या व्यक्तिरेखा समर्थपणे मोठ्या पडद्यावर साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुबोध भावे यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी ठरला. '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील डॉ. घाणेकरांच्या जबरदस्त भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्याला गौरवण्यात आलं. 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Subodh Bhaveसुबोध भावे