शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: राजकीय क्षेत्रातील पदार्पणातच कुणी उमटवला सर्वोत्तम कामगिरीचा ठसा, तुमचं मत नोंदवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 14:25 IST

'राजकारण पदार्पण' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'राजकारण पदार्पण' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.शेती आणि ग्रामीण भागाशी जोडली नाळआ. कैलास पाटील धाराशिव (उद्धव ठाकरे सेना)उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा राजकीय प्रवास असलेल्या कैलास पाटील यांची नाळ शेती आणि ग्रामीण भागाशी जोडली गेलेली आहे. गाव परिसरातील ओढे, नदी, नाल्यांचे पुनरुज्जीवन करून घेतले. ३ हजार शेतकऱ्यांना एकत्र आणून ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांना खत, बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांना स्वयंपुर्ण बनविले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना आग्रह करून ग्रामपंचायत निवडणुकीत उतरवले. तो त्यांचा पहिला विजय. पुढे गावाने त्यांना सरपंच, उपसरपंच बनवले. तेथून ते जिल्हा परिषद सदस्य आणि धाराशिव विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. आमदारकीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात धाराशिवसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चिकाटीने खेचून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

दुष्काळी तालुक्यांच्या विकासाचे मॉडेल तयार आ. रोहित पवार कर्जत-जामखेड  (राष्ट्रवादी काँग्रेस)रोहित पवार बारामती जिल्हा परिषद सदस्य असतानाच होम ग्राउंड सोडून राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात ठाण मांडून प्रत्येक गावाशी, तरुणांशी वैयक्तिक संबंध ठेवत त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणला. निवडून आल्यानंतर कर्जत- जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातून या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू केले आहे. कर्जत- जामखेड हे दुष्काळी तालुके, मात्र हेच तालुके विकासाचा ब्रॅण्ड म्हणून पुढे आणण्यासाठी शासकीय निधी आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी तालुक्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले. शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे गाजलेल्या कोपर्डी गावात मुलींसाठी स्कूल बसची सेवा दिली.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार म्हणून जनसेवेसाठी वाहून घेतलेआ. ऋतुराज पाटील दक्षिण कोल्हापूर (काँग्रेस)ऋतुराज संजय पाटील यांनी तीन वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये लोकांसाठी सतत उपलब्ध असलेला नम्र युवा नेता अशी ठळक प्रतिमा निर्माण केली आहे. पाणी योजना, क्रीडांगण, रस्ते, आरोग्य या सुविधा चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी ऋतुराज पाटील यांनी एक आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. एकीकडे आमदार म्हणून जनसेवेसाठी वाहून घेतले असताना डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त म्हणून काम करताना त्यांनी कोल्हापूरमध्ये सयाजी या पंचतारांकित हॉटेलची त्याचबरोबर डीवायपी सिटी मॉलचीही उभारणी केली आहे. यामुळे कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलून कोल्हापूर शहराच्या प्रगतीला मोठा वेग आला आहे. तळसंदे येथील कॅम्पसमध्ये पहिली ॲग्रीकल्चरल व टेक्निकल युनिव्हर्सिटी सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादानही आ. श्वेता महाले, चिखली, जि. बुलढाणा (भाजप)बुलढाणा जिल्हा परिषद ते आमदार असा श्वेता महाले यांचा प्रवास आहे. जिल्हा परिषदेतील कामाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना चिखली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. महिलांच्या आत्मसन्मानासाठी आई, बहिणींवरून देण्यात येणाऱ्या शिव्यांना गुन्हा ठरवून त्यांना ॲट्रॉसिटींतर्गत आणण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. ग्रामीण भागातील सुमारे ४ हजार गरोदर महिलांना त्यांनी डाळिंब, चिकू, केळी, टरबूज, पपई आणि खरबूजची पाकिटे घरपोच पुरवली. या महिलांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांनी हे काम केले, तसेच फळे विक्रेत्यांकडून फळे घेऊन त्यांचे होणारे आर्थिक नुकसानही त्यांनी टाळले. याशिवाय आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादानही त्यांनी केले आहे.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण मतदारसंघात संपर्क असलेला आमदारआ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे (भाजप)बी.ई. (मेकॅनिकल) शिक्षण घेतल्यानंतर सिद्धार्थ शिरोळे यांनी घरचा हॉटेल व्यवसाय वाढविण्यास सुरुवात केली. वडील खासदार अनिल शिरोळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. २०१७ मध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्याला सुरुवात. वडारवाडी परिसरात त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून अनेक कामे केली. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे संचालक म्हणून त्यांनी पीएमपी सुधारण्यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण मतदारसंघात सातत्याने संपर्क असलेला आमदार अशी प्रतिमा. लेखन, प्रवास, पाककला, छायाचित्रण, बॉलरूम नृत्य, संगीत, जाझ, सूफी यात रुची असलेल्या शिरोळे यांचे ‘जेव्हा कमळ फुलते’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अमेरिका सरकारच्या सर्वांत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नेतृत्वगुण कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व केले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023