शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: राज्यातला कोणता राजकारणी ठरलाय मोस्ट प्रॉमिसिंग? तुमचं मत कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 17:06 IST

राजकारण (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. राजकारण (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी मैदानातआ. अंबादास दानवे, उद्धव ठाकरे सेना, छत्रपती संभाजीनगरउपजिल्हाप्रमुख, नगरसेवक, औरंगाबाद महापालिकेत सभागृह नेता, जिल्हाप्रमुख, आमदार, विरोधी पक्षनेते असा अंबादास दानवे यांचा राजकीय प्रवास आहे. नवीन नेतृत्वाला संधी देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी स्पर्धेत नसतानाही अंबादास दानवे यांना विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी मैदानात उतरविले. कापसाला, उसाला भाव मिळावा म्हणून, गाईंच्या कत्तलीविरोधात शेकडो गाईंसह, वंदे भारत सभागृहासाठी, जायकवाडीतील हक्काचे पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आंदोलने केली. २०१२ पासून बेवारस प्रेतांवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम आजही सुरू आहे. अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, कैद्यांचे पाल्य तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तींचे वाटप सुरू केले. दुसऱ्या फळीतील नेतृत्व करत आहेत.  मत देण्यासाठी येथे क्लिक करा

अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या नेत्याआ. देवयानी फरांदे, मध्य नाशिक (भाजप)घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या देवयानी फरांदे यांनी राजकारणात मिळालेल्या संधीचे सोने करत इथपर्यंत मजल मारली आहे. देवयांनी यांनी राजकारणात स्वत:ला सिद्ध करत वेगळा ठसा उमटवला आहे. नाशिक महापालिकेत १९९७ पासून त्या तीन वेळा सलग नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. २००९ ते २०१२ दरम्यान त्या नाशिकच्या उपमहापौरही होत्या. २०१४ आणि त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्या नाशिक मध्य मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या म्हणून त्या परिचित आहेत. विधानसभेत नाशिक आणि राज्यातील अनेक प्रश्न मांडणाऱ्या फरांदे यांनी वुमन फोरम, दुर्गा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगट तयार करून महिलांना संधी मिळवून दिल्या.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

...आणि आमदाराचा बॅटरी मार्च ठरला ऐतिहासिक आ. कपिल पाटील, जनता दल युनायडेट (शिक्षक भारती)पत्रकार ते आमदार असा कपिल पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आहे. लोकभारती नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. १६ वर्षे ते विधानपरिषदेचे आमदार म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते जनता दल युनायटेड पक्षाचा राज्यातील चेहरा आहेत. कॅपिटेशन फीविरोधी कायद्यासाठीचे आंदोलन, बीएड, डीएड विद्यार्थ्यांचे आंदोलन, सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणीसाठीचे आयोजन अशा सामाजिक लढ्यात ते सहभागी होते. रात्रशाळा वाचविण्यासाठी त्यांनी काढलेला बॅटरी मार्च ऐतिहासिक ठरला होता.  त्यांनी शिक्षकांना १ तारखेला पगार मिळवून दिला, महिलांना १८० दिवसांची मॅटर्निटी लिव्ह मंजूर करून घेतली. त्यांच्यामुळे नववी आणि दहावीचा विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या दर्जाचा बनवला गेला. मत देण्यासाठी येथे क्लिक करा

मी मुंबई अभियान - अभिमानचा प्रणेताआ. प्रसाद लाड, मुंबई (भाजप)प्रसाद लाड विधानपरिषदेचे आमदार असून, ते विधानपरिषदेत भाजपचे प्रतोद आहेत. २०१६ पासून ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. पुण्यातील महालक्ष्मी तिरुपती एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष असून, या माध्यमातून ते बालेवाडी येथील चार हजार विद्यार्थ्यांची काळजी घेतात. लाड अध्यक्ष असलेल्या मी मुंबई अभियान - अभिमान या उपक्रमांतर्गत शेतकरी आठवडी बाजारसह अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातून १ कोटीहून अधिक नागरिक आणि पाच शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ‘आईचा डब्बा’ या उपक्रमांतर्गत अनेक महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला असून, याद्वारे परवडणाऱ्या किमतीत घरपोच अन्नाची गरज भागवली जाते, तसेच ६००० हून अधिक गरजूंना घरपोच वैद्यकीय मदत व औषध देण्यासाठी मोबाइल मेडिकल व्हॅनही त्यांनी सुरू केली आहे. मत देण्यासाठी येथे क्लिक करा

संरक्षणार्थ अंमलात आणला दिशा कायदाआ. यशोमती ठाकूर, तिवसा, जि. अमरावती (काँग्रेस)काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर सलग तीनदा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. वडिलांच्या विचारांचा वारसा जोपासत यशोमती यांनी २००४ साली निवडणूक लढविली, मात्र; काही मतांनी त्यांचा पराभव झाला. २००५ ते २००९ या कालावधीत त्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य होत्या. दरम्यान, २००६ ते २०१० या कालावधीत पक्षाने त्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली. ती त्यांनी समर्थपणे सांभाळत पक्षवाढीसाठी आपले योगदान दिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण विकास, या खात्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, तसेच महिलांच्या संरक्षणार्थ अंमलात आणलेला दिशा कायदा त्यांच्या धाडसी निर्णयाची महाराष्ट्राला प्रचिती देणारा ठरला.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023