शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: क्रीडा विश्वातील कोणत्या शिलेदाराला तुम्ही पुरस्कारासाठी निवडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:50 IST

क्रीडा श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. क्रीडा श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

रिक्षा चालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू...अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू, कोल्हापूररिक्षा चालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू असा अनिकेत जाधवचा प्रवास आहे. अवघ्या १७ व्या वर्षी त्याला जगातील २३ देशांतील संघाविरोधात खेळण्याची संधी मिळाली आहे. अनिकेतची २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र राज्य संघातून सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. त्यातील कामगिरीमुळे तो ओळखला जाऊ लागला. २०१४ मध्ये जर्मनीतील बायर्न म्युनिच या व्यावसायिक फुटबॉल क्लबने युवा फुटबॉलपटू शोधमोहीम घेतली. त्यात पुणे येथे निवड चाचणीत अनिकेत सर्वच पातळीवर सरस ठरला. त्याची जर्मनीला निवड झाली. बायर्न म्युनिच संघाकडून त्याने जर्मनीतील अव्वल संघांविरोधात अनेक गोल केले. त्याच्या या कामगिरीसाठी गोल्डन बूटचा तो मानकरी ठरल्याने अवघ्या जगाचे लक्ष त्याच्याकडे लागले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख असलेली किरणकिरण नवगिरे, क्रिकेट, सोलापूरधडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख असलेली किरण नवगिरे भारतीय संघात निवड होणारी सोलापूर जिल्ह्याची दुसरी क्रिकेटपटू ठरली. महाराष्ट्र संघात निवड झाल्यानंतरही राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची फारशी संधी न मिळाल्याने तिने २०२१-२२ मध्ये नागालँडकडून पाहुणी खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. नागालँडकडून वरिष्ठ टी-२० चषक स्पर्धेत किरणने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ७६ चेंडूंत १६२ धावांची वादळी खेळी करत भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधले. टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूने टी-२० मध्ये केलेली ही पहिली दीडशतकी खेळी ठरली होती. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमिअर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) यूपी वॉरियर्स संघाकडून खेळताना किरणने ९ सामन्यांत १५५ धावा काढताना एक अर्धशतक झळकावले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

सुविधा नसतानाही चमकदार कामगिरीचे प्रदर्शनराजवर्धन हंगरगेकर, क्रिकेट, तुळजापूर, धाराशिवराजवर्धन हंगरगेकर, वय वर्षे अवघे २०; पण लक्ष जगाचे वेधले. धाराशिवसारख्या पुरेशा सुविधा नसलेल्या जिल्ह्यातून जागतिक कीर्तीचा खेळाडू राजवर्धन तयार झाला. टर्फ विकेटची सुविधा नसतानाही प्रशिक्षक राम हिरापुरे यांचे मार्गदर्शन घेत दहावी पूर्ण होण्यापूर्वीच त्याची १४ वर्षांखालील जिल्हा संघात निवड झाली. पुण्यात गेल्यानंतर प्रशिक्षक तेजस ठाकूर यांनी त्याच्या प्रतिभेस पैलू पाडले. अंडर १६, अंडर १९ असा प्रवास करीत भारतीय संघात स्थान मिळवले. अंडर १९ विश्वचषकात कामगिरी करीत त्याने आयपीएलचा दरवाजा ठोठावला. दीड कोटी मोजून चेन्नईने संघात त्याला सामील करून घेतले आहे. पहिल्याच सामन्यात राजवर्धनला स्थानही मिळाले. या संधीचे सोने करीत सर्वाधिक ३ विकेट मिळवीत त्याने भारतीय वरिष्ठ संघाच्या निवड समितीचेही लक्ष वेधले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

बुद्धिबळ इतिहासात सर्वांत युवा ग्रँडमास्टररौनक साधवानी, बुद्धिबळ, नागपूररौनक साधवानी (बुद्धिबळ, नागपूर) भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ठरलेल्या रौनक साधवानी याने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब पटकावला. रौनका हा बुद्धिबळ इतिहासात नववा युवा ग्रँडमास्टरही ठरला. २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे १० वर्षांखालील राष्ट्रकुल विजेता ठरला. डिसेंबर २०२२ मध्ये कझाखस्तान येथे झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत रौनकने सातवे स्थान पटकावत शानदार कामगिरी केली. सप्टेंबर, २०२२ मध्ये चॅलेंजर्स चेस टूरच्या ज्युलिअस बेअर चॅलेंज ऑनलाइन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद. गेल्या वर्षी झालेल्या ४४ व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटातील कांस्य पदक विजेत्या भारत - ब संघातून चमकदार कामगिरी केली असून, अवघ्या जगाला गवसणी घालण्यासाठी ताे सातत्याने कष्ट घेत आहे.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

भारताचा भविष्यातील स्टार नेमबाजरुद्रांक्ष पाटील, नेमबाजी, पालघर  रुद्रांक्ष पाटील (नेमबाजी, पालघर) भारताचा भविष्यातील स्टार नेमबाज म्हणून रुद्रांक्षने अल्पावधीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. डिसेंबर, २०२२ मध्ये रुद्रांक्षने जागतिक १० मी. एअर रायफल क्रमवारीत अव्वल स्थान काबीज करत अभिमानाने तिरंगा फडकाविला. गेल्या वर्षी झालेल्या आयएसएफएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतून पुढील वर्षी रंगणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. रुद्रांक्षने २०२२ साली भारतीय क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधताना जागतिक अजिंक्यपद नेमबाजीमध्ये २ सुवर्ण, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत २ सुवर्ण व २ कांस्य आणि ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली. यानंतर, २०२३ मध्ये त्याने कैरो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत २ सुवर्ण पदक, तर भोपाळ येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत २ कांस्य पदकांची लयलूट केली.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023