शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत की अदालतमध्ये रंगणार जुगलबंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:18 IST

वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते.

मुंबई  - वाचकांच्या मनात राजकारण्यांवर असणारे आरोप, थेट विचारण्याचे काम करणार आहेत प्रख्यात वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, आणि त्यांच्या आरोपांना तेवढीच खुमासदार उत्तरे देण्याचे काम करणार आहेत राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ मान्यवर नेते. ‘लोकमत की अदालत’ हा धमाल आणि अनोखा कार्यक्रम रंगणार आहे नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात.निमित्त आहे, लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधानपरिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांच्या लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळयाचे. येत्या १२ जुलै रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदारांच्या गौरवाचा सन्मान सोहळा सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात येत आहे. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे पाच मान्यवर वाचकांचा आरोपांचा सामना करीत स्वत:चा बचाव करतील.राजकारणात काम करताना नेत्यांवर, मंत्र्यांवर जनता आरोप करत असते, त्यांच्या कामांच्या निमित्ताने प्रश्न विचारत असते. वर्तमानपत्राच्या माध्यमांमधून वेळोवेळी वाचक, अनेक प्रश्न मांडत असतात. आपले लोकप्रतिनिधी विधिमंडळात काय करतात, विधिमंडळे गदारोळासाठी आहेत की जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहेत असे वेगवेगळे पण टोकदार प्रश्न वाचकांच्या मनात असतात. असेच काही बोचरे पण मजा आणणारे प्रश्न घेऊन अ‍ॅड. निकम गुरुवारी ‘लोकमत की अदालत’ मध्ये जनतेच्या व वाचकांच्या वतीने वकिली करतील.या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी आतिश वानखेडे यांच्याशी ९९२२४४४२८८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

टॅग्स :Lokmatलोकमतnewsबातम्या