शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ने केला स्त्रीसन्मानाचा जागर

By admin | Updated: August 7, 2016 01:15 IST

ढोलपथकाचा नाद... स्त्रीशक्तीची महती सांगणारा पोवाडा, पथनाट्य, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर, ‘नारीशक्ती जागृत करूया, नराधमांशी लढा देऊया...’ अशी साद देत

कोल्हापूर : ढोलपथकाचा नाद... स्त्रीशक्तीची महती सांगणारा पोवाडा, पथनाट्य, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर, ‘नारीशक्ती जागृत करूया, नराधमांशी लढा देऊया...’ अशी साद देत कोल्हापूरवासीयांनी शनिवारी स्त्रीसन्मानाचा जागर केला. आम्ही स्त्रियांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणार नाही, अशी शपथ घेत त्यांनी मैत्रीचा आश्वासक हात दिला. गेल्या पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या वरुणराजानेही जणू एकवटलेल्या स्त्रीशक्तीला मुजरा करीत उसंत घेतली आणि सूर्यनारायणानेही लख्ख किरणांनी आपली हजेरी लावली.‘लोकमत’तर्फे मैत्रीदिनाचे औचित्य साधून ‘धागा जोडू मैत्रीचा... सन्मान करू स्त्रीत्वाचा...’ ही संकल्पना घेऊन भवानी मंडपात मानवी साखळी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले यांनी ही मशाल पुढे नेली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे,‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह खासदार संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, महापौर अश्विनी रामाणे यांची उपस्थिती होती. सकाळी नऊपासूनच विद्यार्थी, विद्यार्थिनींसह हजारो कोल्हापूरकरांची पावले भवानी मंडपात वळली. तुतारीच्या ललकारीने उपस्थितांचे स्वागत होत होते. ऐतिहासिक जुना राजवाड्याच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करवीर नादपथकाचे ढोल वाजू लागले. ‘स्त्रीत्वाचा नका करू तिरस्कार, चांगले विचार रुजवा, होईल तुमचा सत्कार...’ असे स्त्रीसन्मानाचा संदेश देणारे फलक हाती घेतलेल्या शेकडो शालेय विद्यार्थिनी, ‘सखी मंच’च्या सदस्या, सामाजिक संस्था, युवक-युवतींचे ग्रुप, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वयोवृद्ध नागरिक अशा समाजातील सर्व घटकांनी स्त्रीसन्मानासाठी हातात हात गुंफत मैत्रीची वीण घट्ट केली. दिल्लीतील निर्भया, कोपर्डी आणि कोल्हापुरातील पल्लवी अशा महिला अत्याचाराच्या घटनांनी महिलांमध्ये सामाजिक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मैत्रीच्या या मानवी साखळीद्वारे मात्र लहान मुली, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती, पुरुषांनी आणि विविध संस्था, संघटनांनी महिलांना ‘तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमचा आत्मसन्मान जपू आणि सदैव रक्षण करू’ अशी ग्वाही दिली. (प्रतिनिधी)