सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत समूहाने गणेशोत्सव काळात वाचकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ ‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’ असे या नव्या उपक्रमाचे नाव आहे़ हा कार्यक्रम २८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन होणार आहे़ या कार्यक्रमाचे पार्टनर्स इंडियन ऑईल सर्वो फ्युचुराजी प्लस व इंडियन ऑईल सर्वो स्कुटोमॅटिक ४ एसटी तर सहप्रायोजक एलजी. आणि स्टार प्रवाह हे आहेत.गणपती बाप्पा आहे सर्व जगाचा विघ्नहर्ता़ सर्वच गणेशभक्तांकडून कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे़ जर या कोरोना काळात आपण स्वत:, आपले नातेवाईक किंवा आपल्या मंडळाने, सोसायटीने लोकांसाठी किंवा समाजाच्या मदतीसाठी काही केले असेल, अशा व्यक्तींना परीक्षकाच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर त्या संदर्भातील कथा आम्हाला शेअर करा. एक छोटासा लेख, फोटोबरोबरच तुमच्या मंडळाचे, सोसायटीचे नाव, गाव, शहर, संपर्क क्रमांकासह आमच्या लोकमत कार्यालयात पाठवा़ या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’; ‘लोकमत’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 14:34 IST