शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 18:23 IST

सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर विधानसभेसाठीही लोकसभेसोबत मतदान होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर नवे सरकार स्थापन होऊ न शकल्याने राज्यात राज्यपाल शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले होते. दरम्यान, नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. मात्र अखेरीस सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 

सुरक्षा व्यवस्थेची उपलब्धता, काश्मीर खोऱ्यात सध्या झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची सुरक्षा आणि इतर आव्हाने विचारात घेऊन सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीरमध्ये केवळ लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Jammu Kashmirजम्मू-काश्मीर