शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागास १५ मार्चनंतर कुलूप!

By admin | Updated: January 7, 2016 02:42 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खर्चाची बिले सादर करायची, खर्च न करताच ती मंजूर करायची, ३१ मार्चनंतर निधी परत जाऊ नये, म्हणून शेवटच्या आठवड्यात वाट्टेल त्या दराने

अतुल कुलकर्णी,  मुंबईमार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खर्चाची बिले सादर करायची, खर्च न करताच ती मंजूर करायची, ३१ मार्चनंतर निधी परत जाऊ नये, म्हणून शेवटच्या आठवड्यात वाट्टेल त्या दराने, पद्धतीने खरेदी करायची, अशा गोष्टींना या वर्षी चाप लावण्यात आला असून, निधी वितरण, पुनर्विनियोजन संबंधीचे कोणतेही प्रस्ताव १५ मार्चनंतर वित्त विभागात स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.अर्थसंकल्पाएवढ्या ३१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची वेळ पहिल्याच वर्षी भाजपा-शिवसेना सरकारवर आली. या आधी आघाडी सरकारने दहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या, तेव्हा विरोधात असणाऱ्या भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नियोजनच करता येत नाही, असे म्हणत, टीका केली होती. मात्र, त्यांनाच ३१ हजार कोटींच्या मागण्या मंजूर करण्याची वेळ आल्यानंतर, खडबडून जाग्या झालेल्या युती सरकारने कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे आता वितरित करण्यात आलेला निधी ज्यांना खर्च करायचा असेल, त्यांनी १५ मार्चच्या आत आपले प्रस्ताव वित्त विभागात द्यावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत आपण १५ मार्चनंतर येणाऱ्या एकाही फाइलवर सही करणार नाही, असे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आर्थिक शिस्त पाळण्यासाठी हे करावेच लागेल असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीची विहित कालमर्यादा ठरवून दिली आहे. याची माहिती संबंधितांनाही देण्यात आली आहे. आपण व्यक्तीश: सगळ्या मंत्री, राज्यमंत्री, सचिवांना पत्र पाठवले आहे. प्रस्ताव वेळेत पाठवणे शक्य झाले नाही, तर ती सगळी जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.मंत्रिमंडळाची, प्रशासकीय, सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता, सचिव समितीची, योजनांतर्गत निधी असल्यास नियोजन विभागाची मान्यताही अनेकदा घेतली जात नाही, नवीन लेखाशीर्ष असल्यास, त्या संबंधीच्या कार्यवाहीची पूर्तता न करताच, शेवटच्या क्षणी अशा फाइली वित्त विभागात येतात. त्यावेळी उपलब्ध असणारा वेळ आणि प्रस्तावांची प्रचंड संख्या पहाता, असे प्रस्ताव तपासणे अशक्य होते. आता वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाणार आहे.