शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला

By admin | Updated: August 2, 2016 05:31 IST

कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरला

डोंबिवली : कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरल्याने सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेमार्गावरील लोकलसेवा कोलमडली. सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याणहून मुंबईकडे होणारी धिम्या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.रविवारी मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकात व कळवा येथे रुळांवर पाणी साचल्याने तसेच पारसिक बोगद्यापाशी रुळांवर माती जमा झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक कोलमडली होती. सोमवारी पहाटे पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे रेल्वे सेवा बाधित असण्याच्या शक्यतेने प्रवाशांनी वेळेअगोदरच रेल्वे स्थानक गाठले. मात्र, लोकल अवघ्या १० मिनिटे लेट असल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कल्याण स्थानकातून सीएसटीकडे जाण्याकरिता ही लोकल निघाली, त्याच वेळी डबा रुळांवरून घसरताच गाडीतील काही प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या टाकल्या. गाडीने वेग घेतला नसल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले नाही. लोकल घसरल्यानंतर घटनास्थळी रोड अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनचे (एआरटी) पथक पोहोचले. त्यांनी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. कल्याणमधील फलाट क्र. १ आणि १ एची वाहतूक बंद करण्यात आल्याने ठाकुर्ली स्थानकातून कल्याणकडे येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या फलाट क्र.४/५ वर वळविण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जलद मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे उपनगरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्ती पथकाला घसरलेला डबा तेथून हलविण्यात अनंत अडथळे आले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पाऊण तास ते एक तास विलंबाने सुरू होती. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. (प्रतिनिधी) >दुपारी १२.२० च्या सुमारास घसरलेला लोकलचा डबा पुन्हा रूळांवर घेण्यात यश आले. त्यानंतर, दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सीएसटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर, तासाभराने दुपारी २.१२ च्या सुमारास कल्याण स्थानकाच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबतची चौकशी सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.सोमवारी सकाळीच ७.२० च्या सुमारास खर्डी स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाला होता. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांना फटका बसला. राज्यराणी एक्सप्रेस आणि पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनही त्यामुळे उशीरा धावल्या. परिणामी, या मार्गावरील हजारो प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले.