शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

स्थानिकांमध्ये होणार चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:34 IST

दिघीचा काही भाग आणि भोसरीतील अधिक भाग असा मिळून प्रभाग क्रमांक पाच तयार झाला आहे.

पिंपरी : दिघीचा काही भाग आणि भोसरीतील अधिक भाग असा मिळून प्रभाग क्रमांक पाच तयार झाला आहे. सामान्य आणि मध्यमवर्गीयांची संख्या या प्रभागात अधिक आहे. या प्रभागात एक जागा ओबीसी आणि उर्वरित तीन जागा या सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने स्थानिकांमध्ये उमेदवारीसाठी सर्वपक्षांत चढाओढ लागणार आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३२ सँडविक कॉलनी आणि प्रभाग ३३ गवळीनगर अशा दोन प्रभागांचा समावेश यंदाच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये झाला आहे. दोन प्रभाग आणि दिघीचा काही भाग या प्रभागात समाविष्ट झाला आहे. एका बाजूने लष्करी हद्द आहे. भोसरी आळंदी रस्ता, भोसरीचा भाग असणारा हा परिसर, प्रभाग पुणे-नाशिक रस्त्याने तोडला गेला आहे. भोसरीतून दिघीला जाणाऱ्या जुन्या रस्त्याने सॅन्डविक कॉलनी प्रभाग आणि दिघीचाही काही भाग तोडला आहे.पुणे-नाशिक रस्त्याने भोसरीतून दिघी रस्त्याने हिंगे शॉपिंग, एमएम लॅडमार्कपासून पुढे लष्करीहद्दीपर्यंत आणि तेथून पुढे पंचशील बुध्दविहार, पांडूरंग रोकडे यांची मिळकत, दिघी गावच्या सीमेने विकास सेल्स, जगताप आणि शितोळे यांची मिळतीपासून भोसरी आळंदी रस्त्यास हा भाग जोडला आहे. भोसरी आळंदी रस्त्याने मयूरी पॅलेस, संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय, गुलाब हाके यांची मिळकत, रूपाली लेडीज टेलरपासून रघुनंदन बिल्डिंगपासून सुवर्णा हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज शाळेपासून पुणे नाशिक रस्त्यास हा प्रभाग जोडला आहे. जुन्या दोन प्रभागांची मोडतोड करून हा प्रभाग तयार केला आहे. गत निवडणुकीत सॅन्डविक कॉलनी प्रभागातून राष्ट्रवादीकडून माजी महापौर मोहीनी लांडे, माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, तसेच गवळीनगर प्रभागातून काँग्रेसचे जालिंदर उर्फ बापू शिंदे, अनुराधा गोफणे हे निवडून आले होते. या प्रभागातील बहुतांश परिसर हा नागरी वसाहतींची असल्याने अनिधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामांचा प्रमुख प्रश्नआहे. उपलब्ध आरक्षणानुसार विद्यमान चारही नगरसेवकांना संधी आहे. दोन वेगवेगळ्या प्रभागातून उभे राहिले. भोसरीच्या राजकारणावर माजी आमदार विलास लांडे यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, पूर्वाश्रमीचे लांडे यांचे शिष्य आमदार महेश लांडगे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लांडे आणि लांडगे गटात वर्चस्ववादासाठी कमालीची चुरस होणार आहे. या प्रभागात गेल्यावेळी दोन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. तर दोन जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना अशा सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. लढतही रंगतदार असणार आहे. गेल्यावेळी काँगे्रसच्या तिकीटावर निवडून आलेले जालिंदर शिंदे आणि अनुराधा गोफणे यावेळी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवितात. याबाबतही भोसरी परिसरात कमालीची उत्सुकता आहे. तसेच भाजपा आणि शिवसेनेची युती होणार का, यावरही या प्रभागात कोण निवडूण येणार आहे, हे ठरेल.(प्रतिनिधी)>समाविष्ट भाग : रामनगर, तुकारामनगर, गुरूदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत आदी इत्यादी भाग समाविष्ट आहे.