शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

एकाच डॉक्टरवर भार

By admin | Updated: May 30, 2016 02:38 IST

गेल्या काही महिन्यांपूवीॅ बदली झाल्याने हे पद रिक्त असून येथे डॉ. प्रदीप जाधव हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत

वसंत भोईर,

वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची गेल्या काही महिन्यांपूवीॅ बदली झाल्याने हे पद रिक्त असून येथे डॉ. प्रदीप जाधव हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना रात्रंदिवस येथे काम करावे लागत आहे. रूग्णालयात एकच डॉक्टर असल्याने रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. वाडा हे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण आहे. विक्र मगड, मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ, शहापूर तालुक्यातील अघई आणि भिवंडी तालुक्यातील अंबाडी व गणेशपुरी या परिसरातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. या रूग्णालयात पुरूष आणि महिलांसाठी प्रत्येकी एक कक्ष आहे. येथे दररोज ३०० ते ३५० च्या आसपास बाह्यÞरु ग्ण तर ४० ते ५० च्या आसपास आंतररु ग्ण तपासणी साठी येत असतात. तर महिन्याकाठी ८० ते ९० प्रसूती होतात. मात्र येथे स्त्री रोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी महिलांना ठाणे व मुंबई येथील सरकारी रूग्णालयात पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांचे हाल होतात. त्याचबरोबर साथीच्या आजाराचेही रूग्ण येत असल्याने त्यांचा अतिरिक्त भार पडत आहे. सर्पदंश, विंचू दंश, गॅस्ट्रो यासारख्या रूग्णांचीही संख्या मोठी आहे. तसेच महामार्गावर अपघात नेहमी होत असल्याने अपघातग्रस्तांनाही उपचारासाठी या रूग्णालयात आणले जाते. परंतु पुरेसे डॉक्टर व सोई सुविधा नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. >रूग्णालयातील अपुऱ्या जागेमुळे विशेषत: पावसाळ्यात रूग्णांवर व्हरांड्यात उपचार करावे लागतात. त्यात भर म्हणून वैद्यकीय अधिकारी एकच असल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होते आहे. >रूग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक, भूलतज्ज्ञ,स्त्री रोग तज्ज्ञ,एक वैद्यकीय अधिकारी अशी चार महत्वाची पदे रिक्त असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली. >रिक्त पदे तातडीने न भरल्यास वाडा ग्रामीण रु ग्णालयाला टाळे ठोकू असा गंभीर इशारा श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी दिला आहे. त्यावर आरोग्य खात्याने मौन पाळणे पसंत केले आहे.