शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

LMOTY 2024: गुन्हा घडूच नये यासाठी झटणारा अधिकारी! IPS सोमय मुंडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 19:04 IST

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.

मुंबई- प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आयपीएस  प्रॉमिसिंग या श्रेणीमध्ये पाच जणांना नामांकन मिळाले होते. यात यंदा म्हणजेच २०२४ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे आयपीएस अधिकारी सोमय मुंडे (Somay Munde, Superintendent of Police, Latur) हे मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्यांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले.

सोमय मुंडे यांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यांच्या शौर्याची ओळख म्हणजे मर्दनटोला जंगल परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पथकातील एकही जीवितहानी होऊ न देता २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे सोमय मुंडे लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. भारतीय पोलीस सेवेत कार्यरत असताना छत्रपती संभाजीनगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांतील त्यांची कारकीर्द गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणारी ठरली आहे. पोलीस पदक तसेच २०२२ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. हयातीत शौर्यचक्राने सन्मानित होणारे ते देशातील दुसरे आयपीएस अधिकारी आहेत. गुन्हे नियंत्रणाबरोबर गुन्हा घडूच नये यासाठी समुपदेशन उपक्रम राबविला. लातूर जिल्ह्यात एमपीडीअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करणारे मुंडे पहिले अधिकारी आहेत.  

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुपर ज्युरी मंडळात डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024