शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2023: मी महाराष्ट्रात मंत्री नाही, खासदार नाही, तुमच्याकडे आपला माणूस म्हणून आलोय; ज्योतिरादित्य शिंदेंनी मन जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 19:50 IST

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

लोकमतने ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई शहरासोबत माझा संबंध खूप जुना आहे. माझी कर्मभूमी मध्य प्रदेश जरी असली तरी जन्मभूमी, कौटुंबिक संबंधांची भूमी महाराष्ट्राची आहे, होती आणि राहणार. दादासाहेब मला मंत्री आल्याचे म्हणाले. मी महाराष्ट्रात मंत्री नाही, खासदार नाही. तुमच्याकडे आपला माणूस म्हणून आलोय, अशा शब्दांत मराठीमध्ये बोलून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यावेळी उपस्थितांचे मन जिंकले.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. 

महाराष्ट्र आज औद्योगिक, शिक्षण आदी क्षेत्रांत प्रमुखता आम्ही पाहतो. महाराष्ट्राची विशेषता ही भारतासाठी बलिदानाची भूमी आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. शिवाजी महाराजांच्या मनात संघर्षमयी जीवन घेऊन, स्वराज्याची मशाल हातात घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. तीच माझीही भूमी आहे, असे केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.  

माझी कर्मभूमी मध्य प्रदेश जरी असली तरी महाराष्ट्र ही जन्मभूमी आहे. शिवाजी महाराजांचा विचार होता, एक भारत श्रेष्ठ भारत. अहत तंजावर, तहज पेशावर सर्व मुलुख आपला. सप्तसिंधु आणि सप्तगंगा मुक्त करा हर हर महादेव, तोच विचार, आत्मनिर्भर भारताचा विचार पंतप्रधानांच्या नेतृत्वात पूर्ण झाली आहे, असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे देशाच्या जीडीपीमधील योगदान हे १५ टक्के आहे, असे ते म्हणाले.

सामाजिक क्षेत्रातील, आरोग्य, औद्योगिक क्षेत्रातील सितारे, असा कार्यक्रम करून सर्वांना प्रेरणा मिळणार. लोकमतचे दर्डा कुटुंब आणि माझ्या कुटुंबाचा तीन पिढ्यांचा संबंध आहे. विश्वासाचे नाते, महाराष्ट्राच्या जनमतात लोकमत स्थापित झाले. लोकमत परिवाराला शुभेच्छा देतो, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेLokmatलोकमत