शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019 : रश्मी वहिनींनी केला वडा, खिचडीचा बेत; युतीचं गणित झालं सेट; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'गुपित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:19 IST

अनेक रुसवे फुगवे, टीकाटिप्पण्यांनंतर अखेर शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा झाली होती. दरम्यान,  युतीची नव्याने गाठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या घडामोडींची माहिती लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर दिली.

मुंबई - अनेक रुसवे फुगवे, टीकाटिप्पण्यांनंतर अखेर शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा झाली होती. दरम्यान,  युतीची नव्याने गाठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या घडामोडींची माहिती लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर दिली. मातोश्रीवर आम्ही गेलो तेव्हा रश्मी वहिनींनी आम्हावा वडे आणि खिचडी खावू घातली. त्यामुळे आम्हाला चर्चेला मार्गच राहिला नाही आणि युतीचा प्रश्न मार्गी लागला,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुखने मुलाखत घेतली. त्यावेळी सुरुवातीलाच युतीच्या प्रश्नावरूनी रितेशने मुख्यमंत्र्यांवर बाऊन्सर टाकला. चार वर्षे भांडल्यानंतर निवडणूक जवळ येताच तुमचे हसरे चेहरे दिसले. मला एवढेच विचारायचे आहे की 'तुम जो मुस्कूरा रहे हो.... क्या गम हे जिसको छिपा रहे रहे हो.'' अशी विचारणा रितेशने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ''जो बित गया सो बित गया, अब नई शुरुवात हो, असा विचार आम्ही केला. तशी आम्हाला एकत्र राहायची सवयच आहेच. सध्या देशात असंगाशी संग करणाऱ्या, एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्यांच्या आघाड्या होत आहेत. पण आम्ही एकमेकांचे चेहरे पाहिले आहेत. चांगल्या आणि वाईट काळातही आम्ही एकमेकांसोबत होतो.आमच्यामध्ये काही कारणांमुळे मतभेद झाले होते. मात्र आता ते मतभेद विसरून आम्ही व्यापक महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत.'' असेही मुख्यमंत्र्यांवी संगितले.'' दरम्यान, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या दिलजमाईमुळे तुम्ही, उद्धवजी, अमित शहा हे एकत्र आलात, या चित्रपटाचे कथानक आम्हाला ऐकायचे आहे, अशी गुगलीही रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांसमोर टाकली. अन् मुख्यमंत्र्यांनीही त्याला तितकेच अनपेक्षित उत्तर दिले. ''मातोश्रीवर आम्ही गेलो तेव्हा रश्मी वहिनींनी आम्हावा वडे आणि खिचडी खावू घातली. त्यामुळे आम्हाला चर्चेला मार्गच राहिला नाही आणि युतीचा प्रश्न मार्गी लागला,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण