शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

यकृतदानामुळे महिलेला मिळाले जीवनदान

By admin | Updated: April 20, 2015 02:49 IST

किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ठाण्यातील ५७वर्षीय महिलेने एका महिलेला जीवनदान दिले. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल

मुंबई : किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ठाण्यातील ५७वर्षीय महिलेने एका महिलेला जीवनदान दिले. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल असलेल्या ५७वर्षीय महिलेला गुरुवार, १६ एप्रिलला सायंकाळी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी यकृतदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मालाड येथे राहणाऱ्या ५३वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे. वर्षातील हे १६वे कॅडेव्हर डोनेशन झाले आहे. यंदा कॅडेव्हर डोनेशनच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यांत १६ कॅडेव्हर डोनेशन झाली आहेत. जनजागृतीमुळे कॅडेव्हर डोनेशनच्या प्रमाणात वाढ झाल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकते, अशी आशा क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ५७वर्षीय महिला गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. या महिलेला डायलेसिस सुरू होते. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सोमवार, १३ एप्रिलला या महिलेला ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी या महिलेला ब्रेन हॅमरेज झाले. यानंतर तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या महिलेला किडनीचा आजार असल्याने किडनी दान करणे शक्य नव्हते. यामुळे तिच्या नातेवाइकांनी यकृतदान करण्याचा निर्णय घेतला. ज्युपिटर रुग्णालयातील एका महिला रुग्णाला यकृत देण्यात आले. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी झाली असून, त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. गेल्या वर्षी, ७१ किडनी, ३६ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, ४१ कॅडेव्हर डोनेशन झाले होते. २०१३मध्ये ३६ किडनी आणि १९ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तर, २४ कॅडेव्हर डोनेशन झाली होती. (प्रतिनिधी)