शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मुंबापुरीत 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 16:52 IST

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे.

मुंबई, दि. 9 - आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. भायखळा येथील राणीबागेहून मोर्चाला सुरुवात झाली असून पुढे हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल. मोर्चेकरांच्या मागण्यांबाबत सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून आलेला निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसमोर मांडला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

LIVE UPDATES 

सहा मुलींच्या शिष्ठमंडळानी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना दिलं निवेदन. शिष्ठमंडळाची मुख्यमंत्र्यासोबतची बैठक संपली. पण मुख्यमंत्री अजूनही बैठकीत आहेत.

मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर धडकला. मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी.

सीएसटी परिसरात मराठा आंदोलक दाखल 

सीएसटी रेल्वे स्टेशनवर मोर्चेकरांची गर्दी

मराठा क्रांती पुस्तकांची विक्री

गर्दीनं अॅम्ब्युलन्सला करुन दिला रस्ता

मराठा आंदोलकांसहीत विनायक मेटे

खडा पारसी पूल परिसरातील गर्दी

चेंबूर : पांजरापोळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासहीत मराठा आंदोलक 

नवी मुंबईतील आंदोलक

मावळ्याचा पोषाख परिधान केलेले आंदोलक

 

मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील सर्व कामकाज बंद. माथाडी, व्यापारी  मोर्चात सहभागी. 

वाशी टोल नाक्यावर सुरळीत वाहतूक. कोंडी टाळण्यासाठी टोल वसुली बंद. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मोठी 3000 तर लहान 200 वाहने मुंबईला रवाना.     

500 महिलांची तुकडी रवाना

अंधेरी,जोगेश्वरी येथील 500 महिलांची तुकडी मोर्चामध्ये सहभागी. 

गोरेगावमधून 50 ते 60 हजार लोक मोर्चात सहभागी 

गोरेगाव  येथून 50 ते 60 हजार मराठा बांधव मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झाल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली. यावेळी कोपर्डीचे सरपंच सतीश सुर्दीक, माजी नगरसेवक सदाशिव पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देऊन आमच्या अन्य मागण्या मंजूर झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी संदीप जाधव यांनी केली.

 

राणीबाग मैदानाला जोडून असलेल्या ई. एस. पाटणवाला मार्गावर आंदोलकांची गर्दी

मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय

एकच चर्चा मराठा मोर्चा

चेंबूर फ्री-वेवर वाहतूक नियंत्रित करताना पोलीस अधिकारी

एपीएमसी मार्केट

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील बेलापूर-सीएसटी ही पहिली 4:30 वाजताची लोकल फुल्ल, ही सर्व मंडळी मराठा मोर्चामध्ये सहभागी नोंदवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तरुणांची खास हेअरस्टाईल  

मोर्चामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी पनवेलहून आंदोलक मुंबईकडे रवाना. मोर्चासाठी नवी मुंबईतून हजारो मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्बर लोकलवर ताण वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 

राज्यभरातून लाखो मोर्चेकरी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. समन्वय समितीने मोर्चाचे सुयोग्य नियोजन केले आहे. आंदोलकांच्या चहा-नाश्तापासून पिण्याचे पाणी, शौचालय, आदी सोयींसह मार्गदर्शनासाठी ६ हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. त्यांना विशेष टी-शर्ट आणि ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत.शाळांना सुटी : दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.२० हजार पोलीसमोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरले आहेत.  पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्तही येथे आहेत.जड वाहनांना बंदीमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरूवारी सकाळपर्यंत जड वाहनांना बंदी आहे.चेंबूरपासून वळवा वाहनेभायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.प्रश्न तत्काळ सोडवा : राणेमराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.वैद्यकीय सुविधा सज्जछत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा