शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटरच्या डिक्कीतून दारुची चोरटी वाहतूक करणारा जेरबंद

By admin | Updated: July 11, 2017 22:17 IST

दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 11 - दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. तर डोंबिवली आणि ठाणे विभागानेही केलेल्या कारवाईत गावठी दारुसह चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन स्कूटर, देशी विदेशी मद्यासह एक लाख एक हजार ९०३ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका स्कूटरमधून बदलापूरात गावठी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाणे भरारी-१ चे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख, अनिल गायकवाड, हवालदार केतन वझे, राजू राठोड आणि कुणाल तडवी आदींच्या पथकाने १० जुलै रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बदलापूर गावातील हॉटेल राजेंद्र जवळ एका स्कूटरसह महेशला पकडले. या स्कूटरच्या डिक्कीतून देशी आणि विदेशी बनावटीचे मद्य या पथकाने जप्त केले. याच स्कूटरजवळ दुसरीही स्कूटर उभी होती. तीही त्याचीच असल्याचे समजल्यानंतर या पथकाने तिच्याही डिक्कीत तपासणी केली. त्यावेळी दुसऱ्याही स्कूटरमध्ये मद्याचा साठा मिळाला. त्याच्याकडून दोन्ही स्कूटरमधील १२.६० लीटर विदेशी, १३.७७ लीटर देशी मद्यासह दोन स्कूटर असा ८८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. दरम्यान, ठाण्याच्या ‘डी’ विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावर, दुय्यम निरीक्षक पी. पी. घुले यांच्या पथकानेही मंगळवारी दुपारी (११ जुलै रोजी) खर्डी गावातील दिवा शीळ रस्त्यावरील महादू निघूकर यांच्या घराशेजारी दत्ता निघूकर यांच्याकडून देशी आणि विदेशी मद्यासह सहा हजार ६८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दत्ता निघूकर यांना अटक करण्यात आली आहे.डोंबिवली विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे यांच्या पथकानेही सोमवारी रात्री मानपाडा येथील हॉटेल राधाकृष्ण आणि कोळसेवाडीतील हॉटेल सेव्हन स्टार येथे छापा टाकून बेकायदेशीर विक्री होणारी २६ लीटर बियर जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.याच पथकाने मंगळवारी दुपारी डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगरातील रोहिदासनगर येथे दारु अवैधपणे विक्री करणाऱ्याला त्यांनी अटक केली.