शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

आयुष्य थबकलं.... स्वरांचा उत्सवही लांबला!,‘लोकमत सूरज्योत्स्ना संगीत पुरस्कारां’ची घोषणा स्थगित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 03:25 IST

एका विशेष सोहळ्यात दरवर्षी ‘लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारां’चे वितरण होते. गेली सहा वर्षे सातत्याने सुरू असलेली ही वार्षिक मैफल यावर्षी स्थगित करण्यात आली असून, संगीत पुरस्कारांची घोषणाही लांबणीवर टाकण्यात आली आहे.

ज्यांचे अवघे आयुष्य स्वरांच्या साथीने दरवळलेले होते आणि अखेरच्या श्वासापर्यंत शुभंकर स्वरांनी ज्यांची साथ निभावली; त्या ज्योत्स्ना दर्डा यांचा आज स्मृतिदिन! त्यांच्या स्मृतींच्या सुगंधाने दरवळणाऱ्याएका विशेष सोहळ्यात दरवर्षी ‘लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारां’चे वितरण होते. गेली सहा वर्षे सातत्याने सुरू असलेली ही वार्षिक मैफल यावर्षी स्थगित करण्यात आली असून, संगीत पुरस्कारांची घोषणाही लांबणीवर टाकण्यात आली आहे.आपला देश आणि अवघ्या जगभरातले वातावरण जीवघेण्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने धास्तावलेले असताना सुरांच्या या वार्षिक मैफलीला अर्धविराम लागणे स्वाभाविकच!अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा संपन्न वारसा समर्थपणेपुढे नेणाºया उमेदीच्या, तरुण स्वरसाधकांचा सन्मान करणारे हे राष्ट्रीय पुरस्कार गेली सहा वर्षे संगीत वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरलेले आहेत. पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित राजन-साजन मिश्रा, जावेद अख्तर, आमिर खान, हरिहरन, शंकर महादेवन, रूपकुमार आणि सुनाली राठोड, प्रसून जोशी, अलका याज्ञिक, अजय-अतुल आदी दिग्गज तसेच शशी व्यास, गौरी यादवडकर हे स्नेही या पुरस्कारांशी अभिन्नपणे जोडले गेले आहेत. २०१४ ते २०१९या काळात ‘लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारां’नी सन्मानित झालेल्या तरुण कलावंतांचे सांगीतिक आयुष्य पुढे कसे बहरत चालले आहे, हे या विजेत्यांच्या नावांकडे पाहताना ठळकपणे जाणवतेच.अन्वर अली खान आणि रीवा राठोड (२०१४), पूजा गायतोंडेआणि ओजस अडिया (२०१५), अंकिता जोशी आणि एस. आकाश (२०१६), स्वयमदृती मजुमदार आणि रमाकांत गायकवाड (२०१७), ब्रजवासी ब्रदर्स आणि अंजली गायकवाड (२०१८), शिखर नाद कुरेशी आणि आर्या आंबेकर (२०१९) यांना आजवर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा आणि त्यानिमित्त महाराष्ट्रातील विविध शहरांत आयोजित होणाºया संगीत मैफली सध्याचे एकूण वातावरण पाहता स्थगित करण्यात आल्या आहेत....पण आकाशात हे असे उदास काळे ढग किती काळ राहतील?प्रसन्न वाºयाच्या लहरत्या लाटा लवकरच हे औदासीन्य धुऊननेतील. पुन्हा नवा प्रकाश उमलेल आणि स्थगित झालेले स्वरही पुन्हा बहरतीलच!...करुणा हे मूल्य सर्वोच्च मानणाºया ज्योत्स्ना दर्डा आज असत्या, तर त्यांच्या ओठांवर अवघ्या जगासाठीच शुभंकर प्रार्थनेचेस्वर असते. आज त्यांची स्मृती जागवताना आम्हीही सगळ्यांसाठी प्रार्थना करतो आहोत, असे ‘सूरज्योत्स्ना परिवारा’चे प्रमुख विजय दर्डा यांनी म्हटले आहे!जीवन की ज्योत्स्ना है, और ज्योत्स्ना का जीवनख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांचे शब्द, सोनू निगम आणि अलकायाज्ञिक यांचा सुमधूर आवाज आणि ललित पंडित यांचे संगीत!...स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींना एकत्र गुंफणारे हे ‘सूरज्योत्स्ना’चे शीर्षकगीत!! शब्द-स्वर आणि संगीताशी अभिन्नपणे जोडलेले हे सुमधूर गीत http://www.surjyotsna.org/ या संकेतस्थळावर ऐकता येईल.

टॅग्स :Lokmatलोकमत