मुंबई : ‘मुस्लिम आरक्षणाचा आदेश व्यपगत झालेला आहे तो रद्द करण्यात आलेला नाही. विरोधकांचे मुस्लिम प्रेम बेगडी आहे. या समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे काही आदेश आहेत. ते तपासून सध्याच्या प्रकरणात काय निकाल येतो ते बघितले जाईल. घटनेच्या चौकटीत राहूनच आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आदींनी केली. मुस्लिम आरक्षणाला सरकार बगल देत असून ते रद्द करण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
मुस्लिम आरक्षणाचा आदेश व्यपगत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
By admin | Updated: March 12, 2015 02:00 IST