शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नद्यांची पातळी घटली

By admin | Updated: June 28, 2014 23:25 IST

जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

नागोठणो :  जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत.  परिसरातील नदीचे पाणी सुद्धा आटत चालले असल्याने नागोठणो पासून डोलवीपर्यंतच्या 45 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाटणसईच्या केटी बंधा:यातून  जे.एस. डब्लू. कंपनीकडून या सर्व गावांना पाणीपुरवठा केला जात असून अंबा नदीतील पाण्याची पातळी दोन ते अडीच फूट एवढय़ा कमी पातळीपर्यंत खाली आली आहे. सध्या दोनपैकी एकच पंपाद्वारे नदीतील पाणी खेचून ते पुढे पाठविले जात आहे. पुढील पाच-सहा दिवसांत पाऊस पडला नाही, तर नदीत पाणीच राहणार नाही, असे प्रत्यक्ष या ठिकाणाला भेट देवून पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे. कोलाड येथून पाटबंधारे खात्यामार्फत कालव्याद्वारे या नदीत येणारे पाणी जर सोडले नाही, तर गंभीर समस्या उद्भवू शकेल असे बोलले जात आहे. 
 
पावसाअभावी  पेरण्या करपण्याच्या मार्गावर, शेतक:यांना फटका
नागोठणो : कोकणासह प्रत्येक जिल्ह्यातील शेतक:यांच्या तोंडचे पाणी सध्या पळाले आहे. पेरणी झाली असली तरी अत्यल्प पावसाने शेतक:यांचे सारे वेळापत्नकच विस्कटून गेले आहे . शेती वाचवण्यासाठी पाईप लावून पाणी शिंपडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुढील आठवडय़़ात गंभीर होण्याची चिन्हे आहेत. 
 मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यासाठी पीक-पाण्याची तयारीही केली गेली. शेतक:यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खत ओढणो, रान करणो, नांगरणो, बियाणांची उपलब्धता याच्या तयारीसाठी गेल्या आठवडय़ात धांदल उडाली होती. पण आता सर्व काही थंड पडले आहे. जूनच्या सुरु वातीस हमखास पाऊस येतो यावर विश्वास ठेवूनच भाताची धूळवाफ पेरणी पूर्ण झाली आहे. भाताची खुरपणी सुरू असताना अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पावसाची हजेरी आठवडाभरात न लागल्यास पश्चिमेकडील भागातील भात पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 
भाताची रोपे सुकू लागली
नेरळ : जून महिना संपत आला तरी कर्जत तालुक्यात चार इंच देखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात भाताची रोपे टाकणा:या शेतक:यांच्या संकटात भर पडली आहे. कारण पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकू लागली आहेत . अनेक ठिकाणी भाताच्या रोपांचे राभ पिवळे पडल्याचे दिसत आहेत . 
 
1पावसाळ्यातील चार महिने शेतकरी आपल्या शेतात शेती करून  काळ्या मातीचे रक्षण करीत असतो. गत वर्षी जूनच्या तीन तारखेला पावसाने सुरु वात केली होती . नंतर सर्व शेतकरी भाताचे रोप तयार करण्यासाठी कामाला लागले होते . त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावून सर्व शेतक:याना दुबार रोप टाकण्याचे काम करावे लागले होते.यावर्षी जूनच्या दुस:या आठवडय़ात पाऊस सुरु  झाला . 
2जेमतेम चार - पाच दिवस कोसळलेला पाऊस थांबला. त्यामुळे भाताची रोपे सुकतांना शेतकरी पाहत आहे. अनेक शेतक:यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी पंप लावून भाताच्या रोपाला घालण्याचा प्रयत्न केला आहे . तरी देखील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणी पुरवठा यात फरक असल्याने भाताची रोपे सुकतांना ती हिरवीगार ठेवणो शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे . तालुक्यातील कोणत्याही शेतात भाताचे राभ सहा इंच पर्यंत वाढलेले दिसत नाही. 
3भाताचे रोप शेतात टाकल्यानंतर ते लावणीसाठी साधारण पंचवीस दिवसात तयार होते . यावर्षी पाऊस चार इंच देखील जून महिना संपत आला तरी झाला नाही . त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ होऊ शकली नाही . त्यात आणखी भर म्हणजे शेतातील भाताचे रोप सुकतांना शेतकरी पाहत आहेत . आणखी आठवडाभर पाऊस सुरु  झाला नाही तर सर्व शेतक:यांना पुन्हा भाताचे बियाणो विकत आणून त्याची राभ भरणी करावी लागणार आहे . या गोष्टी शेतक:यांना न परवडण्यासारख्या आहेत .