शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीने गाठली धोक्याची पातळी: विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 13:42 IST

गंगापूर धरणातून साडेआठ वाजेपासून दहा हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरीची पातळी वाढली आहे.

आॅनलाइन लोकमत / नाशिक : गंगापूर धरणातून सातत्याने गोदापात्रात विसर्ग सुरू असून गोदावरीने धोक्याची पातळी गाठली आहे. गंगापूर धरणातून साडेआठ वाजेपासून दहा हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरीची पातळी वाढली आहे. दोन तासांमध्ये धरणातून सोडण्यात आलेले पाणी शहरातील होळकर पूलाखाली पोहचले. होळकर पूलावरून पुढे ९ हजार ४७० क्यूसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित झाले आहे. दुतोंड्या मारूतीच्या छातीच्या वरपर्यंत पाण्याची पातळी पोहचली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर ओसरला आहे. गंगापूर धरण समुहातदेखील पाऊस कमी झाल्यामुळे सकाळी आठ वाजेपासून अद्यापपर्यंत विसर्गामध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. शनिवारी दुपारपासून रात्रीपर्यंत सलग एक हजार ते दीड हजार क्युसेक ने पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ केली जात होती. कारण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अधिक होते. गोदावरीच्या परिसरातील नागरिकांना गोवर्धन, गंगापूर गावापासून तर थेट नाशिक शहरमार्गे टाकळी, दसकपर्यंत सावधानतेबरोबरच धोक्याचा इशारा आपत्ती व अग्निशामक विभागाकडून दिला जात आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून गोदाकाठालगत गस्त घातली जात आहे. शहरातील रामकुंड ते तपोवन परिसरात नाशिककरांबरोबरच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील जास्त असते. रविवारची सुटी असल्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर पंचवटी अग्निशामक उपकेंद्र, पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील रामकुंड, तपोवन परिसरात तैनात करण्यात आले आहे.

संडे टुरिझम अ‍ॅट गोदाकाठगोदावरीचे सर्व लहान पुल पाण्याखाली गेले आहे. पूर बघण्यासाठी संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल, अहल्यादेवी होळकर पूल, लक्ष्मीनारायण पूल परिसरात नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारची सुटी असल्याने नाशिककर पूर बघण्यासाठी कुटुंबासमवेत सकाळी अक रा वाजेनंतर घराबाहेर पडण्यास सुरूवात झाली. दुपारपासून पूलांवर गर्दी वाढली असून नागरिक पूलावरच वाहने उभी करत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.