मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत गतवर्षी काढण्यात आलेल्या सोडतीत यशस्वी आणि पात्र ठरलेल्या विजेत्यांना लवकरच सूचना पत्र पाठविण्यात येणार आहे. सूचना पत्रानुसार विजेत्यांनी बँकेत रक्कम जमा केल्यानंतर मार्च-एप्रिलपासून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.मुंबई मंडळामार्फत गतवर्षी मे महिन्यात १ हजार ६३ घरांची लॉटरी काढली होती. या लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे. यामधील ३00 विजेत्यांना येत्या काही दिवसांत प्रथम सूचना पत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली. या लॉटरीतील इमारतींना महापालिकेने ‘ओसी’ दिल्यामुळे ताबा देण्याची प्रक्रिया तातडीने मार्गी लागेल.
’म्हाडा’ विजेत्यांना लवकरच सूचना पत्र
By admin | Updated: January 10, 2016 01:47 IST