शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

होऊ दे चर्चा...

By admin | Updated: October 13, 2014 05:16 IST

मच्या चेहऱ्यावर जाऊ नका. आम्ही म्हणजे सर्वात श्रीमंत अन् मालदार पार्टी.. हे बघा माझ्या खिशात ‘चार-चार रुपये!’

- सचिन जवळकोटे

आरं ऽऽ आरं ऽऽ आबाफिर कायकू बोल्या ?(स्थळ : दिवाळीसाठी सजविण्यात आलेला ‘पॉलिटिकल फटाका स्टॉल’. खच्चून सुरुंग भरलेल्या फटाक्यांचे वेगवेगळे अ‍ॅटम्स् रचून ठेवलेले. अशावेळी ‘थोरले काका’ आपल्या घरातील सर्व लेकरा-बाळांना घेऊन स्टॉलवर आलेले.) थोरले काका : माझ्या लेकरांना चांगले फटाके दाखवा. येत्या दोन दिवसांत जोरात उडले पाहिजेत.दुकानदार : (सगळ्यांची देहबोली नीट निरखत संशयानंं) रोख पैसे देऊन घेणार की...अजितदादा : (काकांचं बोट सोडून रागानं) आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका. आम्ही म्हणजे सर्वात श्रीमंत अन् मालदार पार्टी.. हे बघा माझ्या खिशात ‘चार-चार रुपये!’जयंत : (खिशातली साखर खात) माझ्याकडं पण बारदाणं भरून खेळणी आहेत. माझी ‘मिल्क टॉय’ अन् ‘कॉटन टॉय’ तर खूप महाग.रामराजे : हो. हो. आमच्याकडं पण ‘शुगर टॉय’ आहे.छगन : (मफलरमधून तोंड बाहेर काढून कानात कुजबुजत) पण, ती कारखान्याची खेळणी तर केव्हाच बंद पडलीय ना?रामराजे : पण आपल्या दादांनी कोरेगावात तार्इंची खेळणी बंद पाडून पुन्हा ताब्यात घेतलीय की. चांगलीच जिरवलीय तार्इंची.दुकानदार : (आश्चर्यानं) काकाऽऽ तुमची पोरं भलतीच तयारीची. बघावं तेव्हा जिरवा-जिरवीचीच भाषा.(आपली पोरं प्रमाणापेक्षा जास्त बडबडताहेत हे लक्षात येताच ‘काकां’नी गडबडीनं प्रत्येकाला ‘लिमलेट’ची गोळी दिलेली.)काका : पोरांनो ऽऽ गोळी खा. तोंड बंद करा.अजितदादा : काका. मला किनऽऽई भुईचक्कर पाहिजे. मी कऱ्हाडात जाऊन उडवणार.आबा : मलाऽऽ पण सुरसुरीऽऽ पायजे. मी सगळ्यांना वाजवून दाखविणार.काका : (चिडून) तुमची नस्ती ‘सुरसुरी’ बघून मला ‘भुईवर चक्कर’ यायची वेळ आलीय. गप्प बसा ऽऽदुकानदार : (कळवळून) तुमचं ‘आबा लेकरू’ खूपच गरीब दिसतंय होऽऽ. तुम्ही रागावल्यावर बघा कसं केविलवाणं तोंड करून बसलंय.काका : (आबांचा साळसूद चेहरा पाहून चरफडत) पण, आमच्या या हुश्शार लेकराला कुठं काय बोलावं, हेच कळत नाही. आरंऽऽ आबा.. कोणता फटाका पाहिजे?आबा : (समोर बोट दाखवत) मला ना ऽऽ ते ‘रॉकेट’ पाहिजे. मी ते हातातच धरून उडवणार. मज्जाऽऽ येईल बघा काका.दुकानदार : (दचकून) आबा ऽऽ ते रॉकेट लई डेंजर. चुकून उलटलं अन् घरात शिरलं तर ? कारण याचं नावच ‘राजरॉकेट’. म्हणूनच ‘बडे-बडे फटाकोंको छोटी-छोटी बत्ती कभी नहीं लगाना.’काका : (घाम पुसत) हे लेकरू त्याच्यासोबत आमचीपण ‘दिवाळी’ वाजवणार वाटतं. ही घे अजून एक लिमलेटची गोळी.अजितदादा : (सुतळी बॉम्बकडं बोट करत) मला पण काकाऽऽ तो मोठ्ठा-मोठ्ठा ‘मोदी फटाका’ पाहिजे. मी त्याला ‘धरणा’त नेऊन उडविणार. त्याचा आवाज म्हणे खूप- खूप मोठ्ठा. (खिशातून माचीस काढत) लावू का इथंच त्याला बत्ती ?काका : (घाईघाईनं लिमलेट गोळ्यांचा अख्खा डबाच देत) लेकरांनो ऽऽ हे घ्या सगळ्या गोळ्या; पण ती ‘बाबा’ छाप माचीस आत ठेवा. तुम्ही आपलं ‘देव-विनोद’ टिकली उडवा. मी त्या ‘सुतळी बॉम्ब’चं बघतो.दुकानदार : (काकांना कोपऱ्यापासून दोन्ही हात जोडत) काका ऽऽ तुमची मात्र धन्य-धन्य; कारण अशा ‘डेंजर’ लेकरांना घेऊन म्हणे तुम्ही यंदाची ‘दिवाळी’ साजरी करणार ! यू आर ग्रेट !!