शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गद्दार फडणवीस सरकारची उचलबांगडी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:50 IST

अजित नवले : सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी २६ जुलैपर्यंत करा; सांगलीत शेतकरी जनजागरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची फसवी घोषणा केली. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून चर्चा केली. त्यांनीही लगेच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. जरा आनंद झाला; पण आदेश निघाल्यानंतर विश्वासघातच झाल्याचे लक्षात आले, अशी टीका शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी केली. सरसकट कर्जमाफीची दि. २६ जुलैपर्यंत अंमलबजावणी करा, अन्यथा शेतकऱ्यांची पोरेच सरकार खाली खेचतील, असा इशाराही त्यांनी दिला.राज्यव्यापी शेतकरी जनजागरण यात्रा शनिवारी सांगलीत आली. यावेळी सामाजिक, शेतकरी संघटनांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी डॉ. नवले बोलत होते. ते म्हणाले की, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यातून २० ते ३० टक्केही शेतकरी कर्जमुक्त होईल, अशी परिस्थिती नव्हती. तरीही मुख्यमंत्र्यांनी ९० लाख शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याची घोषणा करून स्वत:चेच गुणगाण केले. सुकाणू समितीने त्या घोषणेवर आक्षेप घेऊन पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील चर्चेसाठी आले. त्यांनीही लगेच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. आम्हाला आनंद झाला; पण कर्जमाफीच्या आदेशात पुन्हा जाचक अटींचाच भरणा केल्याचे दिसून आले. चंद्रकांतदादांनी फडणवीस यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे पाप करून विश्वासघात केला. त्यामुळेच सुकाणू समितीला शेतकरी जनजागरण यात्रा काढण्याची वेळ आली. आम्हालाही आता लिहिता, वाचता येते. शेतकऱ्यांची पोरेही शिकली आहेत. त्यांना बनवाबनवीचे आदेश काढून कोणी फसवू शकत नाही. सरसकट म्हणजे थकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही कर्जमाफी करीत असल्याचा लेखी आदेश दि. २६ जुलैपर्यंत काढा, अन्यथा शेतकऱ्यांची पोरे रस्त्यावर उतरून तुम्हाला खुर्चीवरून खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला.ते म्हणाले की, शेतकरी आणि संघटनांमध्ये भांडणे लावून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सरकारमधील काही मंडळी करतील. पण, तो प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी शेतकऱ्यांच्या साथीची गरज आहे. सुकाणू समितीचे सदस्य व सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले म्हणाले की, सरकार कर्जमाफीच्या आकड्यांचा खेळ खेळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. उद्योगपतींना क्षणात आठ लाख कोटींची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना एक लाखाची कर्जमाफी देताना, मात्र फूटपट्टी लावली जाते. या भांडवलधार्जिण्या सरकारला उलथवून लावण्याची गरज आहे.भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, तथाकथित गद्दार शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. याला साथ सरकारचीच होती. कर्जमाफीचा रोज नवनवा आदेश काढून सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. या लबाडांचे आवतन जेवल्याशिवाय खरे मानता येत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर, कर्ज काढा; पण शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त केलेच पाहिजे.यावेळी सुकाणू समितीमधील सुशिला मोराळे, किसन गुजर, रोहिदास धुमाळ, खंडू वाघमारे, नीलेश तळेकर, सुभाष काकुस्ते, प्रफुल्ल कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, संदीप राजोबा, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, पंचायत समिती सदस्या जयश्री डांगे, अ‍ॅड. सुभाष पाटील, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, विजयराव भोसले, नितीन चव्हाण, शेतकरी संघटनेचे जयपाल फराटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील आदी उपस्थित होते. कॉ. उमेश देशमुख यांनी स्वागत केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी प्रास्ताविक केले.गद्दारी कराल तर, शेतकऱ्यांची पोरं काठ्यांनी फोडतीलमुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, तुम्हीच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांशी गद्दारी कराल तर पोरं आत्महत्या करणार नाहीत, काठ्यांनी फोडतील, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी देताच शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. संघटनेचा झेंडा, जात, धर्म बाजूला ठेवून यापुढे एकजुटीने रस्त्यावरील लढाई करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, असे ते म्हणाले. ५शेट्टी, रघुनाथदादांची मेळाव्याला दांडीजिल्ह्यातील सर्व संघटनांनी हा शेतकरी मेळावा आयोजित केला होता. मात्र सुकाणू समितीचे प्रमुख खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दांडी मारल्याबद्दल उलट-सुलट चर्चा रंगली होती. या मेळाव्यात शेट्टी व रघुनाथदादा काय बोलणार, हे ऐकण्यासाठी शेतकरी आले होते. पण त्यांची निराशा झाली. दोघा नेत्यांची वाट पाहण्यामुळे मेळावा दोन तास उशिरा सुरू झाला, तरीही ते उपस्थित राहू शकले नाहीत.‘राजा उदार होतो आणि हाती भोपळा मिळतो’ याप्रमाणे राज्य सरकारच्या घोषणा आहेत. थकबाकीदार कर्जदारांना कर्जमुक्त होण्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत. यातून ३० टक्केही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही. नियमित कर्जदारांना २५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी शंभर टक्के कर्जाची रक्कम भरण्याची अट घातली. २५ हजारांच्या सवलतीसाठी त्या शेतकऱ्याने दहा ते पंधरा लाखांचे कर्ज कोठून भराचे, असा सवालही डॉ. नवले यांनी केला..मोदींना विसर : फडणवीसही त्याच मार्गावरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या सांगलीतील प्रचार सभेत स्वामिनाथन आयोगाच्या शंभर टक्के शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर लगेच मोदींना आश्वासनांचा विसर पडला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू शकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करून आपण किती खोटे बोलून जनतेची फसवणूक करतो, ते त्यांनी सिध्द केले आहे. त्यांचेच चेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसही चुकीची कर्जमाफी घोषित करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत, अशी टीका डॉ. अशोक ढवळे यांनी केली.गद्दारी कराल तर, शेतकऱ्यांची पोरं काठ्यांनी फोडतीलमुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, तुम्हीच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांशी गद्दारी कराल तर पोरं आत्महत्या करणार नाहीत, काठ्यांनी फोडतील, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी देताच शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. संघटनेचा झेंडा, जात, धर्म बाजूला ठेवून यापुढे एकजुटीने रस्त्यावरील लढाई करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, असे ते म्हणाले. प्रमुख मागण्यासरसकट कर्जमाफी शंभर टक्के वीज बिल माफी शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च भरून त्यावर ५० टक्के नफा द्याशेतीला शंभर टक्के सिंचनाची व्यवस्थाशेतकरी विरोधातील आयात धोरण बंद करून शेतकरी हिताचे धोरण खते, बियाणे, कीटकनाशके शेतकऱ्यांना माफक दरात द्यासर्व पिकांना विमा लागू करा, नैसर्गिक आपत्तीनंतर लगेच शेतकऱ्यांना भरपाई